आधी कारचा पाठलाग, मग गाडी अडवून धारधार शस्त्रांनी वार, नागपुरात कुख्यात गुंड बाल्या बिनेकरची सिनेस्टाईल हत्या

नागपुरात कुख्यात गुंड बाल्या उर्फ किशोर बिनेकर याची पाच अज्ञात इसमांनी सिनेस्टाईल हत्या केली (Murder of goon Balya Binekar in Nagpur)

आधी कारचा पाठलाग, मग गाडी अडवून धारधार शस्त्रांनी वार, नागपुरात कुख्यात गुंड बाल्या बिनेकरची सिनेस्टाईल हत्या
Follow us
| Updated on: Sep 26, 2020 | 8:18 PM

नागपूर : नागपुरात कुख्यात गुंड बाल्या उर्फ किशोर बिनेकर याची पाच अज्ञात इसमांनी सिनेस्टाईल हत्या केली. ही घटना सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोले पेट्रोल पंपाजवळ घडली. विशेष म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील घरापासून अर्धा किमी अंतरावरच ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे (Murder of goon Balya Binekar in Nagpur).

बाल्या बिनेकराचं नागपुरात सावजी भोजनालय आहे. त्याचबरोबर तो जुगार अड्डा चालवायचा. त्याच्यावर काही हल्लेखोर पाळत ठेवून होते. हल्लेखोरांनी आज बाल्या बिनेकरच्या कारमागे बाईकने पाठलाग केला. बोले पेट्रोल पंपाजवळ आल्यावर त्यांनी बाल्याची गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी बाल्यावर चाकू आणि कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात बाल्या बिनेकरचा जागीच मृत्यू झाला.

या थरारक घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बाल्या बिनेकरचा गुन्हेगारी रेकॉर्ड पाहता हा गँगवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, बाल्याची हत्या अंतर्गत वादातून झाल्याचा अंदाज गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

नागपुरात याआधीदेखील अशाप्रकारचे घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे नागपुरात एककीडे कोरोनाचा कहर असताना गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. याआधी 3 ते 4 जून दरम्यान 24 तासात तीन हत्येच्या घटना घडल्याचं समोर आलं होतं (Murder of goon Balya Binekar in Nagpur).

हेही वाचा :

तू कोट्यधीश होणार, फेक कॉलमुळे मित्रांचे ‘खयाली पुलाव’, वादावादीतून तरुणाची हत्या

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.