AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरकरांना धोक्याची घंटा, 77 टक्के कोरोना मृत्यू हे पन्नाशी ओलांडलेले!

वयाची पन्नाशी ओलांडलेल्या नागरिकांना धोक्याचा इशारा असल्याचे पाहायला मिळत आहे. (Nagpur Above 51 age Corona Patient Death rate high) 

नागपूरकरांना धोक्याची घंटा, 77 टक्के कोरोना मृत्यू हे पन्नाशी ओलांडलेले!
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 07, 2020 | 5:46 PM
Share

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद यांसह इतर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. नागपुरात 51 वर्षावरील वय असणाऱ्या सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे वयाची पन्नाशी ओलांडलेल्या नागरिकांना धोक्याचा इशारा असल्याचे पाहायला मिळत आहे. (Nagpur Above 51 age Corona Patient Death rate high)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात 51 वर्षांवरील सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात पहिल्या लाटेत 51 वर्षांवरील 2 हजार 458 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 77 टक्के रुग्ण हे 51 वर्षांवरील आहेत.

दरम्यान 51 वर्षांवरील मृत्यूची संख्या ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात जास्त आहे. नागपूर शहरात 1426 पुरुष, 586 महिला तर ग्रामीणमध्ये 321 पुरुष आणि 125 महिलांचा मृत्यू झाला आहे. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या अनेकांना रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह आणि इतर सहव्याधी राहतात. यामुळे कोरोनावरील उपचारास योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

वयोगटानुसार मृत्यू

  • 0 ते 15 वयोगट – 12
  • 16 ते 30 वयोगट – 94
  • 31 ते 50 वयोगट – 600
  • 51 व पुढील वयोगट – 2458

नागपुरात आतापर्यंत 1 लाख 16 हजार 606 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 08 हजार 965 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 3014 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत 4 हजार 585 कोरोना रुग्ण सक्रीय आहेत.  (Nagpur Above 51 age Corona Patient Death rate high)

राज्यातील कोरोना अपडेट 

दरम्यान महाराष्ट्रात काल (6 डिसेंबर) 4 हजार 757 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल दिवसभरात 40 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा  18 लाख 52 हजार 266 इतका झाला आहे. तर 47 हजार 734 कोरोनाबाधित मृत्यू झाले आहेत. सध्या राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा 2.58 टक्के इतका आहे.

तर महाराष्ट्रात काल 7 हजार 486 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा एकूण आकडा हा 17 लाख 23 हजार 370 इतका झाला आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 12 लाख 73 हजार 705 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 52 हजार 266 (16.43 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 56 हजार 085 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 5 हजार 903 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. (Nagpur Above 51 age Corona Patient Death rate high)

संबंधित बातम्या : 

मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई, त्यांनी प्रदुषणावर लक्ष घालावं, आता अधिकाऱ्यांना धुण्याची वेळ, मनसेचा इशारा

महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हजारो अनुयायांची पत्राद्वारे भावनिक साद!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.