पुतण्याला शिवीगाळ केल्यावरुन वाद, नागपुरात घरात घुसून शेजाऱ्याची निर्घृण हत्या

पुतण्याला शिवीगाळ केल्यावरुन वाद, नागपुरात घरात घुसून शेजाऱ्याची निर्घृण हत्या

क्षुल्लक कारणावरुन शेजाऱ्याची घरात घुसून निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना अंबाझरी हद्दीत घडली

Nupur Chilkulwar

|

Oct 05, 2020 | 11:57 PM

नागपूर : क्षुल्लक कारणावरुन शेजाऱ्याची घरात घुसून निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना अंबाझरी हद्दीत घडली (Nagpur Ambazari Neighbor Murder). पांढराबोडी सुदर्शन मंदिराजवळील ट्रस्ट लेआऊट येथे ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे (Nagpur Ambazari Neighbor Murder).

याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. हे तिघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे सांगितलं जात आहे. अशोक संतराम नहारकर, असे मृतकाचे नाव आहे. मुन्ना महातो, त्याचा मुलगा रामु महातो आणि चेतन महातो अशी आरोपींची नावे आहेत.

लहान मुलांच्या क्षुल्लक वादातून ही हत्येची घटना घडली. अशोक संतराम नहारकर यांच्या पुतण्याला शेजारी राहणाऱ्यांनी अश्लिल शिवीगाळ केली. “तू इतना बडा हो गया क्या? तेरी बदमाशी निकालता हुं”, असे त्यानी त्या लहान मुलाला म्हटलं. तसेच, त्यांनी नहारकर यांच्याशीही वाद घातला.

यावेळी नहारकरांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त शेजाऱ्यांनी उलट त्यांनाच मारहाण केली. इतकंच नाही तर थेट शस्त्र घेऊन त्यांच्या घरात घुसले. या निर्दयी शेजाऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करुन त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.

Nagpur Ambazari Neighbor Murder

संबंधित बातम्या :

संगमनेरमध्ये भावाकडून अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार, मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड

वडिलांच्या पीएफच्या पैशाचा वाद, मुलांकडून जन्मदात्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

लिफ्टच्या बहाण्याने अल्पवयीन तरुणीला किस, आरोपी 5 महिन्यांनी कल्याणमध्ये जेरबंद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें