AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका सभा रद्द करा, तुकाराम मुंढेंचं पत्र, सभा तर घेणारच, महापौरांचं उत्तर

नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. Nagpur Mayor vs commissioner Tukaram Mundhe

महापालिका सभा रद्द करा, तुकाराम मुंढेंचं पत्र, सभा तर घेणारच, महापौरांचं उत्तर
| Updated on: Jun 16, 2020 | 12:56 PM
Share

नागपूर : नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापौर संदीप जोशी यांना पत्र लिहून 20 तारखेची महापालिकेची सभा रद्द करण्यासं सांगितलं. त्यासाठी तुकाराम मुंढेंनी कोरोनाचं कारण दाखवून, नगरसेवकांमुळे कोरोनाचा प्रसार होईल म्हणून सभा रद्द करा, असं नमूद केलं. मात्र महापालिकेची सभा घेण्यावर महापौर ठाम आहेत. (Nagpur Mayor vs commissioner Tukaram Mundhe)

महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढेंची विनंती फेटाळून लावली आहे. सर्व पक्षांशी चर्चा करुन सभा घेण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे.

महापौर आणि आयुक्तांमधील वाद

महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वाद काही नवा नाही. भाजपची सत्ता असलेल्या या महापालिकेत यापूर्वी अनेक विषयांवरुन दोघांमध्ये खटके उडाले आहेत. यापूर्वी नागपुरात ‘कोरोना’बधित रुग्णांचा आकडा दररोज वाढताना असताना (Nagpur Commissioner Tukaram Mundhe on Mayor Sandeep Joshi) यासाठी महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केला होता. या आरोपावर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. आपण सगळं काम नियमाला धरून करत आहे, त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणं चुकीचं आहे, असे तुकाराम मुंढे म्हणाले होते.

वाचा : नागपुरात वाढत्या ‘कोरोना’ रुग्णसंख्येला महापालिका प्रशासन जबाबदार, महापौरांचा आरोप

तुकाराम मुंढे यांनी 27 जानेवारीला नागपूर महानगरपालिका आयुक्त म्हणून पदभार (PS Tukaram Mundhe One Month) स्वीकारला. तेव्हापासून महापौर विरुद्ध आयुक्त अशी कुरबूर सुरु आहे.

सत्ताधारी आणि महापालिका आयुक्तांमध्ये संघर्ष व्हावा, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुद्दाम तुकाराम मुंढे यांची नागपुरात बदली केली असावी, असं मत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी त्यावेळी व्यक्त (Nagpur Mayor on Tukaram Mundhe) केलं होतं.

नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि भाजप नगरसेवकांच्या पहिल्या वहिल्या भेटीत अनोख्या प्रकारचं हे चित्र पाहायला मिळालं होतं. भाजपच्या 108 नगरसेवकांच्या भेटीसाठी अवघे 15 मिनिटं वेळ का दिला? नगरसेवक आत येताना सुरक्षा रक्षकांनी का तपासलं? नगरसेवकांना बसायला खुर्च्या का नाही? या प्रश्नांनी आयुक्त तुकाराम मुंढे आणि भाजप नगरसेवकांच्या पहिल्या भेटीची सुरुवात झाली होती.

(Nagpur Mayor vs commissioner Tukaram Mundhe)

संबंधित बातम्या 

नागपुरातील वाढत्या कोरोनावरुन आयुक्तांकडे बोट, आता तुकाराम मुंढेंचं महापौरांना उत्तर

म्हणून मुख्यमंत्र्यांकडून तुकाराम मुंढेंची नागपुरात बदली : महापौर 

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.