Nagpur Corona | नागपुरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 300 पार, प्रशासनाच्या कठोर निर्णयानंतरही कोरोना का पसरतोय?

राज्याची उपराजधानी नागपूर कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे.

Nagpur Corona | नागपुरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 300 पार, प्रशासनाच्या कठोर निर्णयानंतरही कोरोना का पसरतोय?
Follow us
| Updated on: May 11, 2020 | 6:45 PM

नागपूर : नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 300 पार गेली (Nagpur Corona Cases Increases) आहे. शिवाय, नागपुरात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता आणखी कठोर पावलं उचलायला (Nagpur Corona Cases Increases) सुरवात केली आहे.

राज्याची उपराजधानी नागपूर कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी 300 चा आकडा पार केला आहे. नागपुरातील मुख्य हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरामध्ये 107 तर मोमीनपुरामध्ये 137 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

सतरंजीपुरा हा नागपुरातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट ठरला आहे. या ठिकाणी 86 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास 1700 लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं. तर मोमीनपुरा भागातही एका 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर त्या भागातील 600 च्या वर नागरिकांना क्वारंटाईन (Nagpur Corona Cases Increases) करण्यात आलं होतं.

त्यानंतर आता रामेश्वरी परिसरात एका युवकाच्या मृत्यूनंतर तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला आणि नागपूरची चिंता वाढली. या भागात जवळपास 250 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. नागपूरला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावलं उचलली जात आहेत.

नागपुरात कोरोना रुग्ण संख्या का वाढत आहे?

– सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा दाटीवाटीच्या परिसर – या भागातील नागरिकांनी सुरवातीला प्रशासनाला सहकार्य केलं नाही – दोन्ही भागात एक-एक व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू, त्यांच्या संपर्कात मोठ्या प्रमाणात नागरिक – नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्यापेक्षा माहिती लपवायला प्राधान्य दिलं

प्रशासनाच्या उपाययोजना काय?

– सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा हा भार प्रशासनाने पूर्णतः सील करुन नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव केला – या भागातील घरा घरात सर्वेक्षण केले जात आहे – संशयित असल्यास क्वारंटाईन केलं जातं आहे – दाटीवतीच्या वस्ती असल्याने ड्रोन ची नजर – गरोदर महिलांना त्याच भागात उपचाराची व्यवस्था – शय रोगाच्या रुग्णांची तपासणी – नागरिक घराबाहेर पडू नये यासाठी या भागात SRPF आणि GRP चे 200 जवान तैनात

नागपुरात पाच कंटेन्मेंट झोन असून त्यात मुख्य हॉटस्पॉट सतरंजीपुरा, मोमीनपुरा, भालदारपुरा, गिट्टीखदानचा काही भाग, शांती नगर, खामला, आता नवीन झालेला पार्वतीनगर, पांढराबोडी, टिमकी, कमल चौक, गुप्ता नगर या भागांचा समावेश आहे.

नागपुरात कोरोनाचे 301 रुग्ण

नागपूर शहरात 301 पॉझिटिव्ह रुग्णांची आता पर्यंत नोंद झाली आहे तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा 94 वर पोहोचली आहे. नागपुरात आतापर्यंत तिघांचा कोरोनामुळे (Nagpur Corona Cases Increases) मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईतून गावी परतला, घरी न जाता थेट शेतात जाऊन राहिला, तरीही कोरोना पॉझिटिव्ह निघाला

वर्ध्यात कोरोनाग्रस्त महिलेच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित 141 जण क्वारंटाईन, 13 गावं सील

तान्ह्या बाळासाठी शहापूरची शिवसेना धावली, पहाटे 3 पासून अडकलेल्या उत्तर भारतीय चिमुरड्यासाठी दुधाची व्यवस्था

1 वरुन 31 रुग्णांपर्यंत मजल, मालेगावनंतर आता येवलाही कोरोनाचा हॉटस्पॉट ठरण्याची भीती

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.