शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या माजी शहरप्रमुखाला बेड्या

मंगेश कडव याच्यावर गेल्या काही दिवसात नागपुरात फसवणूक, धमकावणे, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल झाले होते (Nagpur Ex Shivsena Official Mangesh Kadav Arrested)

शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या माजी शहरप्रमुखाला बेड्या
Follow us
| Updated on: Jul 09, 2020 | 9:04 AM

नागपूर : खंडणीसह पाच गुन्ह्यांमध्ये फरार असलेला नागपूरचा माजी शिवसेना शहरप्रमुख मंगेश कडव याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी संध्याकाळी सापळा रचून कडवला पांढराबोडी परिसरातून अटक केली. गेल्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. (Nagpur Ex Shivsena Official Mangesh Kadav Arrested)

मंगेश कडव याच्यावर गेल्या काही दिवसात नागपुरात फसवणूक, धमकावणे, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर शिवसेनेने त्याची शहरप्रमुखपद आणि पक्षातूनही हकालपट्टी केली होती. फरार असताना मंगेश कडव कोणाच्या आश्रयाला गेला, तो कुठे होता, याची माहिती पोलिस घेत आहेत.

पत्नी रुचिता कडवला अटक झाल्यानंतर मंगेश कडवही आत्मसमर्पण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. बुधवारी तो न्यायालयात शरण येणार असल्याचीही चर्चा होती. मात्र कडव आला नाही. अखेर पांढराबोडी परिसरात पोलिसांनी पाठलाग करुन त्याला अटक केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

कडव याच्याविरुद्ध 30 जूनला अंबाझरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सक्करदरा, हुडकेश्वर, बजाननगर व सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये खंडणी व फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले.

(Nagpur Ex Shivsena Official Mangesh Kadav Arrested)

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.