शिवबंधन-घड्याळ-शिवबंधन, चार दिवसात पारनेरच्या पाच नगरसेवकांबाबत काय-काय घडले?

नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, मात्र चारच दिवसात त्यांची सेनेत घरवापसी झाली.

शिवबंधन-घड्याळ-शिवबंधन, चार दिवसात पारनेरच्या पाच नगरसेवकांबाबत काय-काय घडले?
Follow us
| Updated on: Jul 08, 2020 | 4:00 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या पारनेरच्या पाच नगरसेवकांची चारच दिवसात शिवसेनेत घरवापसी झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर या नगरसेवकांनी पुन्हा शिवबंधन बांधले. चार दिवसात पाच नगरसेवकांबाबत काय काय घडले, हे पाहणे उत्सुकतेचे आहे. (Parner Shivsena Corporators Returns in Party Check out Timeline)

अहमदनगरमधील पारनेरचे पाच नगरसेवक सध्या चांगलेच चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर हे नगरसेवक शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्यासह आज (8 जुलै) दुपारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते.

या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत चारच दिवसांपूर्वी शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधले होते, त्याच लंके यांच्या उपस्थितीमध्ये या नगरसेवकांनी मातोश्रीवर पुन्हा ‘शिवबंधन’ हाती बांधले.

हेही वाचा : निलेश लंकेंनी राष्ट्रवादीत आणलं, मिलिंद नार्वेकरांनी ‘करुन दाखवलं’, पारनेरच्या नगरसेवकांची घरवापसी

नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, मात्र चारच दिवसात त्यांची सेनेत घरवापसी झाली.

पारनेर ते मातोश्री घटनाक्रम

शनिवार 4 जुलै 2020 : शिवसेनेला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अहमदनगरमधील पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांचा बारामतीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

रविवार 5 जुलै 2020 : राष्ट्रवादीच्या रणनीतीचा वचपा काढत कल्याणमध्ये शिवसेनेची नवी राजकीय खेळी, कल्याण पंचायत समितीमध्ये थेट भाजपशी हातमिळवणी करत राष्ट्रवादीला कात्रजचा घाट

सोमवार 6 जुलै 2020 : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा. पोलीस उपायुक्त बदल्या आणि इतर विषयांसह पारनेरवरही चर्चेची शक्यता

मंगळवार 7 जुलै 2020 : महाविकास आघाडीतील पक्षांमध्येच झालेले पक्षांतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी. आमचे नगरसेवक परत पाठवा, असा अजित पवार यांना निरोप

मंगळवार 7 जुलै 2020 : रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे, आज राष्ट्रवादीकडे भीक मागत आहेत, मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

मंगळवार 7 जुलै 2020 : पारनेरचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेले, म्हणजे अजित पवारांनी फोडले असा अर्थ नाही, शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मंगळवार 7 जुलै 2020 : “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आमची नाराजी नाही. स्थानिक नेतृत्वाला कंटाळून आम्ही निर्णय घेतला. पारनेरचा पाणी प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित. तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला” अशी पारनेरच्या नाराज नगरसेवकांची प्रतिक्रिया.

हेही वाचा : EXCLUSIVE | ….म्हणून आम्ही राष्ट्रवादीत गेलो, शिवसेना सोडणाऱ्या पारनेरच्या नगरसेवकांची खदखद

“माजी आमदारांच्या हुकूमशाहीमुळे शिवसेना सोडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कोणतीही नाराजी नाही. पण, माजी आमदारांमुळे पक्ष सोडवा लागला” अशीही खदखद व्यक्त

हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

“कोणत्याही विकासाची कामे होत नव्हती, म्हणून आम्ही राष्ट्रवादी जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही पुन्हा शिवसेनेत जाणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावल्यास आम्ही ‘मातोश्री’वर जाऊन इथली परिस्थिती मांडू. पण, तूर्तास तरी शिवसेनेत पुन्हा परतण्याचा विचार नाही” अशी मंगळवार 7 जुलैला संध्याकाळी भूमिका (Parner Shivsena Corporators Timeline)

मंगळवार 7 जुलै 2020 : पारनेर हा फार लहान प्रश्न, तो काही राज्यस्तरावर परिणाम करणारा प्रश्न नाही, शरद पवार यांचं मत

बुधवार 8 जुलै 2020 : दुपारी 1 वाजता – पाचही नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचीही उपस्थिती

बुधवार 8 जुलै 2020 : दुपारी 2 वाजता – मिलिंद नार्वेकर आणि आमदार निलेश लंके यांच्यासह पाचही नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर. हातावर शिवबंधन बांधून सेनेत घरवापसी, तर राष्ट्रवादीला अलविदा

पाहा व्हिडिओ :

संबंधित बातम्या 

पारनेरचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेले, म्हणजे अजित पवारांनी फोडले असा अर्थ नाही : संजय राऊत

रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे, आज राष्ट्रवादीकडे भीक मागत आहेत, मनसेचा शिवसेनेवर हल्ला

कोण आहेत पारनेरचे 5 नगरसेवक, ज्यांच्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस?

सत्ता अबाधित राखायची असेल तर सेनेचे नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना थेट निरोप

पारनेरमधील फोडाफोडीनंतर शिवसेनेने ‘करुन दाखवले’, राष्ट्रवादीला कल्याणमध्ये दणका

(Parner Shivsena Corporators Returns in Party Check out Timeline)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.