रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे, आज राष्ट्रवादीकडे भीक मागत आहेत, मनसेचा शिवसेनेवर हल्ला

नगरसेवक फोडाफोडीच्या घटनेवरुन शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरु असताना, आता मनसेने शिवसेनेवर हल्लाबोल केला. MNS Sandeep Deshpandes attack on Shiv Sena

रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे, आज राष्ट्रवादीकडे भीक मागत आहेत, मनसेचा शिवसेनेवर हल्ला
संदीप देशपांडे आणि उद्धव ठाकरे

मुंबई : नगरसेवक फोडाफोडीच्या घटनेवरुन शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरु असताना, आता मनसेने शिवसेनेवर हल्लाबोल केला. मनसे सरचिटणीस माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन, शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. “रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरुन सर्जिकल स्ट्राईकची फुशारकी मारणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादी काँग्रेसकडे भीक मागत आहेत. कालाय तसमें नमः”, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं. (MNS Sandeep Deshpandes attack on Shiv Sena)

शिवसेनेने ऑक्टोबर 2017 मध्ये मुंबई महापालिकेतील मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक फोडले होते. मुंबई महापालिकेत शिवसेनेने आपली सत्ता स्थिर राखण्यासाठी ही खेळली होती. त्यावेळी बेसावध मनसेवर शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक असे खिजवण्यात आलं होतं. मनसे नगरसेवकांनी फुटून शिवसेनेत प्रवेश केल्याने महापालिकेत शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ वाढले होते.

त्या घटनेचा संदर्भ देऊन मनसेने पारनेरमधील शिवसेना नगरसेवक फुटीवरुन हल्लाबोल केला. “मनसेचे नगरसेवक रात्रीच्या अंधारात चोरुन सर्जिकल स्ट्राईकची फुशारकी मारणारे, आज स्वत:चे नगरसेवक राष्ट्रवादीकडे भीक मागत आहेत. याला कालाय तसमें नम: असं म्हटलं पाहिजे. जे तुम्ही इथे पेरणार आहात, तेच उगवणार आहे. महाभारतात सुद्धा अभिमन्यूला छळकपटाने मारणाऱ्यांना महाभारतामध्येच त्याची फळं भोगावी लागली हे त्यांनी लक्षात ठेवावं. जे पेराल तेच उगवेल”, असं संदीप देशपांडे म्हणाले.

TOP 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर

नगर जिल्ह्यातील पारनेरमधील पाच नगरसेवकांनी थेट अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील तणाव वाढला आहे. राज्यात एकत्र सत्तेत असताना, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षातील नगरसेवक फोडले जात असतील तर ते खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून व्यक्त होत आहेत.

उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना रोखठोक निरोप

राष्ट्रवादी काँग्रेसने पारनेरमधील शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे (Uddhav Thackeray on Parner NCP Politics). यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘आमचे नगरसेवक परत पाठवा, असा संदेश पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत अजित पवार यांना संपर्क साधत निरोप कळवला.

(MNS Sandeep Deshpandes attack on Shiv Sena)

संबंधित बातम्या 

सत्ता अबाधित राखायची असेल तर सेनेचे नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना थेट निरोप   

‘मातोश्री’च्या निकटवर्तीय मंत्र्याची गृह खात्यात ढवळाढवळ, राष्ट्रवादीची नाराजी? 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI