लॉकडाऊनमुळे 10 बाय 10 च्या घरात लग्न, पोलीस वऱ्हाडी, 5-6 जणांची हजेरी

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात अनेकांची लग्न खोळंबली (Police guest in Orphans girl Wedding Nagpur) आहेत.

लॉकडाऊनमुळे 10 बाय 10 च्या घरात लग्न, पोलीस वऱ्हाडी, 5-6 जणांची हजेरी
Follow us
| Updated on: May 06, 2020 | 2:07 PM

नागपूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात अनेकांची लग्न खोळंबली (Police guest in Orphans girl Wedding Nagpur) आहेत. त्यामुळे अनेकांनी आपली लग्न पुढे ढकलली आहेत. तर काहींनी साध्या पद्धतीने लग्न उरकली आहेत. नागपूरमध्येही एका निराधार मुलीनं साध्या पद्धतीत 10 बाय 10 च्या घरात लग्न केलं आहे. अंजली बांगरे असं या निराधार मुलीचे नाव आहे. विशेष म्हणजे या निराधार मुलीच्या लग्नात पोलीसचं वऱ्हाडी बनून आले (Police guest in Orphans girl Wedding Nagpur) होते.

लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ कसा करायचा हा प्रश्न सध्या अनेक वर आणि वधूकडील मंडळींना पडला आहे. पण यावर नागपूरच्या अंजलीने उपाय शोधला आणि साध्या पद्धतीने तिने आपले लग्न उरकले. विशेष म्हणजे अंजलीला आई-वडील नसल्यानं पोलीसंच या लग्नात वऱ्हाडी बनून आले होते. पाच ते सहा पाहुण्यांच्या उपस्थितित हा लग्न सोहळा पार पडला आहे.

अंजलीने निलेश टेटे या तरुणाशी लग्न केलं आहे. नागपूर जिल्ह्यातील महादूल्यात अंजली आणि निलेशचा विवाह समारंभ पार पडला. अगदी साध्या पद्धतीने आणि कमीत कमी खर्चात हे लग्न करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात या लग्नाची चर्चा सुरु आहे.

नुकतेच पुण्यात एका लग्नात वर आणि वधूचे वडील पोहचू शकले नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी मुलीचे कन्यादान केले. पुण्यात आयटी इंजिनिअर असलेल्या आदित्य बीश्तने डॉक्टर असलेल्या नेहा कुशवाहसोबत विवाह केला. पोलिसांनीच कन्यादान केल्यामुळे वर-वधू दोघांनाही आनंद झाला होता.

संबंधित बातम्या :

पुण्यात अनोखं लग्न, मुलाचे वडील देहरादूनमध्ये, मुलीचे वडील नागपुरात, पोलिसांकडून कन्यादान

लॉकडाऊन वाढल्याने लग्न लांबली, विदर्भातील हजारपेक्षा अधिक लग्न लांबणीवर

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.