रुग्णासोबत आलेल्या व्यक्तीला मास्क घालण्याची विनंती, नागपुरात डॉक्टरांना मारहाण

रुग्णासोबत आलेल्या व्यक्तीला मास्क घालण्यास सांगितल्याने चिडून खासगी डॉक्टरला मारहाणीची घटना घडली. (Nagpur doctor beaten by Patient Relatives)

रुग्णासोबत आलेल्या व्यक्तीला मास्क घालण्याची विनंती, नागपुरात डॉक्टरांना मारहाण

नागपूर : रुग्णासोबत आलेल्या व्यक्तीला मास्क घालण्यास सांगितल्याने चिडून खासगी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात ही घटना घडली. (Nagpur doctor beaten by Patient Relatives)

नागपूर जिल्ह्यातील कोरोनास्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे. मास्क न घालणाऱ्या 500 रुपयांचा दंडही ठोठावला जातो आहे.

मात्र, तरीही काही नागरिक मास्क घालत नसल्याचं चित्र आहे. कळमेश्वर तालुक्यातील या खाजगी डॉक्टरांकडे आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाने मास्क घातला नव्हता. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला मास्क घालण्याची विनंती केली. मात्र, त्या व्यक्तीने मास्क घालण्यास नकार दिला.

यावर वाद घालत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली. हा सर्व प्रकार cctv मध्ये कैद झाला आहे. या विरोधात संबंधित डॉक्टरांनी पोलिसात तक्रार दिली. मात्र, नंतर तक्रार मागे घेण्यात आली. दरम्यान, डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीचा कळमेश्वर डॉक्टरर्स असोसिएशनच्या वतीनं निषेध करण्यात आला़. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे. तसेच डॉक्टरांना संरक्षण न दिल्यास दवाखाने बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Nagpur doctor beaten by Patient Relatives)

संबंधित बातम्या : 

जालन्यात सहा जणांकडून शेतवस्तीतील घरावर दरोडा, एक लाख 58 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल लंपास

अंगणवाडी सुपरवायझरकडून पोषण आहाराची अफरातफर, डोंबिवलीत धान्याच्या टेम्पोसह महिला रंगेहाथ

Published On - 4:16 pm, Tue, 15 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI