नागपुरातील टेक्सटाईल उद्योग सुरु, दीड महिन्यानंतर रोजगार रुळावर

नागपूरच्या ग्रामीण भागात असलेली निर्मल परिवाराची टेस्कटाईल मिल सुरु झाली (Nagpur Textile Business Start) आहे.

नागपुरातील टेक्सटाईल उद्योग सुरु, दीड महिन्यानंतर रोजगार रुळावर

नागपूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन (Nagpur Textile Business Start) करण्यात आलं होतं. यामुळे देशाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात 25 हजार कंपन्या सुरु झाल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. यात नागपूर जिल्ह्यातील काही उद्योगांचाही समावेश आहे.

नागपूर शहर रेड झोनमध्ये असला तरी ग्रामीण भागात कन्हान गाव सोडलं तर इतर (Nagpur Textile Business Start) कुठेही  कोरोना  रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात उद्योग रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. नागपूरच्या ग्रामीण भागात असलेली निर्मल परिवाराची टेस्कटाईल मिल सुरु झाली आहे.

सरकारच्या सूचनेनुसार सोशल डिस्टन्सिंग पाळत, या ठिकाणी कामगार कामावर यायला लागले आहेत. कोरोनाच्या या संकटात एकीकडे रोजगार जात आहेत. तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात ग्रामीण तरुणांना रोजगार देणारे हे उद्योग सुरु झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या दीड महिन्यात नागपूर जिल्ह्यातील सर्वच कॉटनमिल बंद होत्या. यामुळे मोठं नुकसान झालं आहे. मात्र तरीही या टेक्सटाईलच्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना संपूर्ण पगार दिल्या निर्मल टेक्सटाईलच्या व्यवस्थापकांनी सांगितलं आहे. शिवाय लॉकडाऊनच्या संकटामुळे नोकर कपात करणार नसल्याचंही त्यांनी (Nagpur Textile Business Start) सांगितलं.

संबंधित बातम्या : 

रुतलेले अर्थचक्र रुळावर, महाराष्ट्रात 25 हजार कंपन्या सुरु, 6 लाख जणांच्या हाताला काम

मुंबईतील लोक कोरोना घेऊन येतील अशी गावकऱ्यांमध्ये भीती, आंतरजिल्हा एसटीचा निर्णय लवकरच : अनिल परब

Published On - 8:25 am, Tue, 12 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI