AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करारनामा नाही तर पाणीपुरवठा नाही!, जलसंपदा विभागाचं नाशिक महापालिकेला पत्र, दिवाळीनंतर विशेष बैठक

जलसंपदा विभागाकडून नाशिक महापालिकेशी पत्रव्यवहार सुरु असून, करारनाम्याची कारवाई पूर्ण करण्याची आठवण करुन देण्यात आली आहे. त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यास थेट पाणीपुरवठा बंद करण्याचा इशाराच देण्यात आल्यानं या दोन्ही संस्थांमधील संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे

करारनामा नाही तर पाणीपुरवठा नाही!, जलसंपदा विभागाचं नाशिक महापालिकेला पत्र, दिवाळीनंतर विशेष बैठक
| Updated on: Nov 15, 2020 | 9:26 AM
Share

नाशिक: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह अन्य धरणातील पाणी उचलण्यासंदर्भात महापालिका आणि जलसंपदा विभागातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जलसंपदा विभागासोबत करारनामा करण्यासाठी महापालिकेची अनास्था दिसून येत असल्याचा आरोप जलसंपदा विभाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाकडून महापालिकेशी पत्रव्यवहार सुरु असून, करारनाम्याची कारवाई पूर्ण करण्याची आठवण करुन देण्यात आली आहे. त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यास थेट पाणीपुरवठा बंद करण्याचा इशाराच देण्यात आल्यानं या दोन्ही संस्थांमधील संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाची दिवाळीनंतर विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. (Meeting of Water Resources Department and Nashik Municipal Corporation after Diwali on the issue of water supply)

नाशिक शहराला गंगापूर, दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्या बदल्यात महापालिका जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टी भरतं. याबाबत दोन्ही संस्थांमध्ये अद्याप करार मात्र झालेला नाही. दरम्यान, महापालिकेने करारासाठी 1.10 कोटी रुपये जलसंपदा विभागाकडे यापूर्वीच अदा केले आहेत. असं असताना महापालिकेककडून करार होत नसल्याने जलसंपदा विभागानं गेल्या 12 वर्षांपासून महापालिकेकडून पाणी वापराच्या सव्वापट दंड आकारला आहे.

पाणीपुरवठ्यासाठी पूर्वी 10 हजार लीटरला साधारण 2.10 रुपये दर होता. मात्र, लावलेल्या दंडानुसार 10 हजार लीटरला 2.60 रुपये दर लावण्यात आला आहे. त्यानुसार गंगापूर धरणातून उचललेल्या पाण्यासाठी 23.33 कोटी रुपये , तर दारणा धरण्यातील पाण्यापोटी 6 कोटी रुपयांचं बिल जलसंपदा विभागानं महापालिकेला पाठवलं.

जलसंपदा विभागाच्या पत्रात काय इशारा?

पाणीपट्टीबाबतचा वाद संपुष्टात येण्यासाठी एकेरी दराने असणारी थकीत पाणीपट्टी महापालिकेनं अद्या केल्यानंतर करारनामा करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेला यापूर्वीही करारनामा करण्याबाबत कळवलं आहे. पण अद्याप करारनामा झालेलना नाही. यात महापालिकेची अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे थकबाकीही वाढत आहे. करारनामा करण्याबाबत वारंवार कळवूनही तो झाला नाही तर संस्थांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई जलसंपदा विभाग करु शकतं, असं पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला लिहिलं आहे. दरम्यान, या मुद्द्यावर महापालिका आणि जलसंपदा विभागाची एक विशेष बैठक दिवाळीनंतर ठेवण्यात आली आहे. त्या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या:

नाशिकमधील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला कार्यमुक्त करा, महापौरांचे अध्यक्षांना पत्र

उद्धव ठाकरेंचे एकत्र लढण्याचे संकेत, नाशिक मनपासाठी महाविकास आघाडीचा मेगाप्लॅन

Meeting of Water Resources Department and Nashik Municipal Corporation after Diwali on the issue of water supply

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.