नाशिकमधील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला कार्यमुक्त करा, महापौरांचे अध्यक्षांना पत्र

महापौरांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अध्यक्षांना पत्र लिहित या अधिकाऱ्याला कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. (Mayor Letter to Chairman on Nashik Smart City Project dispute)  

नाशिकमधील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला कार्यमुक्त करा, महापौरांचे अध्यक्षांना पत्र
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 12:52 PM

नाशिक : नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या मनमानी कारभाराविरोधात आता पालिकेच्या महापौरांनीच दंड थोपटले आहे. थविल यांच्या बदलीसाठी महापौरांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अध्यक्षांना पत्र लिहित या अधिकाऱ्याला कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. (Mayor Letter to Chairman on Nashik Smart City Project dispute)

केंद्रात, राज्यात आणि पालिकेत भाजपचं सरकार असताना अनेक लोकप्रतिनिधींचा विरोध डावलून नाशिक शहरात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्याचा निर्णय भाजपने घेतला. मात्र भाजपाचा हाच निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे. सुरुवातीपासून वादात राहिलेल्या नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या मनमानी कारभारामुळे सत्ताधारी भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.

मात्र महापौरांनी ही कोंडी फोडत या प्रकल्पाचे अध्यक्ष सिताराम कुंटे यांच्याकडे थविल यांच्या मनमानी कारभाराची तक्रार केली. ठेकेदारांना परस्पर मुदत वाढ देणे, सदस्यांना विश्वासात न घेता सुरु असलेले कामकाज अशा सर्वच तक्रारीचा पाढा महापौर सतीश कुलकर्णी यांनी वाचला. तसेच थविल यांना कार्यमुक्त करण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान माहापौरांच्याया तक्रारीनंतर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याप्रकरणी योग्य ती कारवाई करु, असे सांगितलं आहे. भाजपनेच त्यांच्या सत्ताकाळात हा प्रकल्प राबवला आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन कारवाई करु, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

नाशिक शहरात या स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत आजवर केवळ नुतनीकरनाची कामे झाली असून एकही प्रकल्प पूर्ण करण्यात आलेला नाही. शहरातील अशोक स्तभं ते त्र्यंबक नाका हा 1 किलोमीटरचा रस्ता उभारण्यासाठी 17 कोटी रुपये ठेकेदाराला देण्यात आले.

मात्र पावणे तीन वर्षे उलटूनही या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने या ठेकेदाराला 80 लाखाचा दंड ही करण्यात आला. मात्र थविल यांनी एकाही संचालकाला विश्वासात न घेता ठेकेदाराचा हा 80 लाखाचा दंड ही माफ केला. अशा एक ना अनेक तक्रारी आणि मनमानी कारभारामुळे दस्तुरखुद्द पालिकेच्या महापौरांनी त्यांच्या बदलीची मागणी केली आहे.

त्यामुळे आता महापौरांच्या पत्रानंतर स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे, प्रकाश थविल यांच्याबाबत काय निर्णय घेणार हे बघणे महत्वाचं ठरणार आहे. (Mayor Letter to Chairman on Nashik Smart City Project dispute)

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी: औरंगाबादेत गगनचुंबी इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा; महापालिका आणि क्रेडाईच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

एक दिवसाच्या आमदार सविता पानकर यांचं निधन; लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्न अधुरं

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.