मोठी बातमी: औरंगाबादेत गगनचुंबी इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा; महापालिका आणि क्रेडाईच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

मोठी बातमी: औरंगाबादेत गगनचुंबी इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा; महापालिका आणि क्रेडाईच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
रिअल इस्टेटला सुगीचे दिवस! स्टॅम्प ड्युटी सवलतींमुळे मालमत्तांचे रजिस्ट्रेशन दुप्पटीने वाढले

यापूर्वी औरंगाबादमध्ये केवळ 11 मजल्याच्या इमारती उभारण्यास परवानगी होती. | Aurangabad mahanagarpalika

Rohit Dhamnaskar

|

Nov 07, 2020 | 10:00 AM

औरंगाबाद: प्रशासनाच्या निर्णयामुळे आता औरंगाबाद जिल्ह्यात गगनचुंबी इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकतीच यासंदर्भात औरंगाबाद महानगरपालिका आणि क्रेडाईच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. यावेळी औरंगाबादमध्ये 15 मजली इमारती बांधण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता औरंगाबादमध्ये बांधकाम क्षेत्रासाठी प्रगतीची नवी कवाडे खुली झाल्याचे बोलले जात आहे. (15 story building permission pass in Aurangabad region)

सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच औरंगाबादमध्ये 22 मजली इमारती बांधण्यासही परवानगी मिळू शकते. त्यामुळे आता मुंबई-पुण्यासारख्या शहरांप्रमाणे औरंगाबादेतही गगनचुंबी इमारती उभारल्या जातील. महापालिका आणि क्रेडाईच्या अधिकाऱ्यांमध्ये यासंदर्भात बैठक झाली होती. यावेळी बांधकाम उद्योगासंबंधी अनेक महत्त्वाच्या मुद्दयांवर चर्चा झाली. त्यामुळे भविष्यात औरंगाबादमध्ये बांधकाम उद्योग क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे.

यापूर्वी औरंगाबादमध्ये केवळ 11 मजल्याच्या इमारती उभारण्यास परवानगी होती. त्यासाठीही बऱ्याच अटी-शर्तींचे पालन करावे लागत होते. त्यामुळे बांधकाम उद्योजकांना मर्यादित संधी उपलब्ध होत्या. या पार्श्वभूमीवर गगनचुंबी इमारतींसाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या समितीकडून करण्यात आलेल्या शिफारसीअंती 15 मजल्याच्या इमारती उभारण्यास परवानगी देण्यात आली.

औरंगाबादेत उद्योग सावरले; कामगारांची दिवाळी

कोरोनाच्या संकटानंतर आता औरंगाबादमधील बंद पडलेले अनेक उद्योग पुन्हा रुळावर आले आहेत. त्यामुळे येथील कामगारांची दिवाळी आनंदात जाणार असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत 75 टक्के उद्योगांकडून कामगारांना 80 कोटी रुपये बोनसचे झाले वाटप झाले आहे. उर्वरित 25 टक्के उद्योग 10 तारखेपर्यंत बोनस वाटप करतील. लॉकडाऊनच्या धक्क्यानंतर उद्योगांकडून कामगारांना दिल्या जाणाऱ्या या घसघशीत बोनसमुळे औरंगाबादमधील कामगार वर्ग चांगलाच खुश आहे.

इतर बातम्या:

वेल्डर, कटर, सीएनसी ऑपरेटर्स मिळेनात, उद्योगांना कुशल कर्मचाऱ्यांची वानवा

बांधकाम क्षेत्राला मदत करा, शरद पवाराचं पंतप्रधान मोदींना चौथं पत्र

धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ, जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

(15 story building permission pass in Aurangabad region)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें