नाशकात शिवसेनेचं काय होणार? सिंगल वॉर्डची सेनेलाच भीती?

अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीत वॉर्ड रचना अर्थात एक सदस्यीय प्रभाग रचना होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

नाशकात शिवसेनेचं काय होणार? सिंगल वॉर्डची सेनेलाच भीती?

नाशिक : नाशिकमध्ये महापालिकेसाठी होऊ घातलेली सिंगल वॉर्ड पद्धतीला शिवसेनेनं विरोध करायला सुरुवात केलीय. ही पद्धत नाशिकवर भगवा फडकवण्यात अडथळा आणू शकते अशी भीती स्थानिक सेना नेते व्यक्त करतायत. यातून मार्ग काढण्यासाठी स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतलीय. शिवसेनेनं द्विसदस्यीय प्रभाग रचनाच ठेवा अशी मागणी केलीय. (Shiv Sena opposes single ward system in Nashik)

आघाडीत बिघाडी निश्चित?

राज्य पातळीवरचे आघाडीचे नेते कितीही सगळ्या निवडणुका एकत्र लढण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात बोलत असले तरीसुद्धा स्थानिक पातळीवर मात्र एकमेकांच्याविरोधात जोर बैठका काढताना दिसतायत. नाशकात काल शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तिनही पक्षांच्या स्वतंत्र बैठका झाल्या आणि तिन्ही पक्षांनी एकला चलोचा नारा दिला. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या भावना डालवून आघाडी एकत्र लढण्याचा निर्णय कसा घेणार याकडेही लक्ष लागलंय.
नाशिक शिवसेनेचा गड व्हावा!

नाशिक पालिकेची जबाबदारी खा. संजय राऊत यांच्याकडे आहे. गेल्या काही काळापासून ते नाशिकचे दौरेही करतायत. त्यांनीही शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचेच संकेत दिलेत. एवढच नाही तर नाशिकला शिवसेनेचा बालेकिल्ला करा असं आवाहनही राऊतांनी केलंय. तर दुसरीकडे भाजपानेही कंबर कसत बाळासाहेब सानपांना पुन्हा पक्षात प्रवेश दिलाय. ते शिवसेनेतून भाजपात गेल्यामुळे काही समिकरणं बदलतात का तेही महत्वाचं असणार आहे.

सिंगल वॉर्ड पद्धत कुणाच्या फायद्याची?

नाशकात सिंगल वॉर्ड पद्धत होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. पण ही पद्धत शिवसेनेच्याच विरोधात जाणार असा कयास स्थानिक पातळीवर व्यक्त केला जातोय. त्यात शिवसेना नेत्यांचाच भरणा जास्त आहे. त्यासाठीच ह्या नेत्यांनी आता मुख्यमंत्र्यांना यात लक्ष घालायची विनंती केलीय.

संबंधित बातम्या

नाशिकची सिंगल वॉर्ड पद्धत कुणाला सत्ताधीश करणार?

नाशिक मनपात तिन्ही पक्षांचा एकला चलोचा नारा, आघाडीत बिघाडी निश्चित?

नाशकात शिवसेनेची स्वबळाची चाचपणी, काँग्रेसचीही बैठक, मविआचं काय होणार?

(Shiv Sena opposes single ward system in Nashik)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI