नाशिकची सिंगल वॉर्ड पद्धत कुणाला सत्ताधीश करणार?

अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीत वॉर्ड रचना अर्थात एक सदस्यीय प्रभाग रचना होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

नाशिकची सिंगल वॉर्ड पद्धत कुणाला सत्ताधीश करणार?
नाशिक महापालिका.

नाशिक : अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीत वॉर्ड रचना अर्थात एक सदस्यीय प्रभाग रचना होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. 15 मार्च पूर्वी वॉर्ड रचना करावी लागणार असल्याने आता हीच रचना निवडणुकीत अंतिम राहिल हे जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नाशिकची सिंगल वॉर्ड पद्धत कुणाला सत्ताधीश करणार? अशी चर्चा आता नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. (Nashik mahapalika Election Single Ward method)

महाविकास आघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनात एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यासंदर्भात जो निर्णय घेतला होता, तो बदलायचा असल्यास नव्याने सुधारणा विधेयक पारित करणे आवश्यक आहे. मात्र सद्यस्थितीत तरी महाविकास आघाडीने किंवा विरोधकांनी देखील याबाबत कोणतीही हालचाल सुरु न केल्याने एक सदस्यीय प्रभाग रचना अर्थात  सिंगल वॉर्ड सिस्टिम अंतिम राहिल असा अंदाज आहे. साधारण 15 हजार मतदारांचा एक वॉर्ड राहील, अशी शक्यता आहे.

राज्यात भाजप सेना सत्तेत असताना चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली होती. मात्र या प्रभाग पद्दतीमुळे वॉर्डाचा विकास होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. याशिवाय ही प्रभाग पद्धती महाविकास आघाडीला नुकसानकारक असल्याने एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार येणाऱ्या महापालिका निवडणुका लढवल्या जातील हे जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी चुरशीच्या होणार हे निश्चित आहे.

नाशिक महापालिकेची निवडणूक 2022 ला, मात्र सर्वपक्षीयांच्या तयारीला आतापासून सुरुवात

नाशिक महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. आणखी एक वर्षाहून अधिक काळ निवडणुकीसाठी शिल्लक आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिक महापालिकेत शिवसेनेचा महापौर करण्यासाठी आतापासूनच जातीने लक्ष घालायला सुरुवात केली आहे. तर भाजप आणि राष्ट्रवादीच्याही बैठकावर बैठका सुरु आहेत.

नाशिक महापालिकेत भाजप सत्तेवर आहे तर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेचं काम जोरात आहे. येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवर येण्याचा दांगडा आत्मविश्वास आहे. त्यादृष्टीने शिवसेनेने आतापासून जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने नाशिक महापालिकेची निवडणूक तिन्ही पक्ष मिळून एकत्र लढावी की स्वतंत्र लढावी, याविषयी अजून चर्चा सुरु आहे.

(Nashik mahapalika Election Single Ward method)

संबंधित बातम्या

नाशिक पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची रणनीती, राऊतांचा विश्वासू नेता महानगरप्रमुख

नाशिक महापालिकेसाठी भाजपच्या जोरदार हालचाली, सानपांकडे मोठी जबाबदारी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI