जयंत पाटलांनी गौरवलेल्या कार्यकर्त्यांकडून पुण्यात पत्रकाराच्या पत्नीची बदनामी

पुणे : महिलांवरील अत्याचार असेल किंवा महिलांविरोधातील कोणतीही गोष्ट असेल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी सक्रियपणे त्याची दखल घेत असतात. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडूनच महिलांची कशी बदनामी केली जाते, त्याचं उदाहरण पुण्यात समोर आलंय. एका पत्रकाराच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोहसीन शेख, महादेव बालगुडे आणि […]

जयंत पाटलांनी गौरवलेल्या कार्यकर्त्यांकडून पुण्यात पत्रकाराच्या पत्नीची बदनामी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

पुणे : महिलांवरील अत्याचार असेल किंवा महिलांविरोधातील कोणतीही गोष्ट असेल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी सक्रियपणे त्याची दखल घेत असतात. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडूनच महिलांची कशी बदनामी केली जाते, त्याचं उदाहरण पुण्यात समोर आलंय. एका पत्रकाराच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मोहसीन शेख, महादेव बालगुडे आणि सचिन बाळासाहेब कुंभार अशी या तिघांची नावं आहेत. पत्रकार कृष्णा वर्पे यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोहसीन शेखचा शिलेदार राष्ट्रवादीचे म्हणून गौरव केला होता. शिवाय त्याचं कौतुकही केलं होतं.

सचिन कुंभार याने पत्रकाराच्या पत्नीवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. सचिन कुंभारच्या फेसबुक टाईमलाईवर या पत्रकाराविरोधात अनेक पोस्ट करण्यात आल्याचं दिसतं. तर या तक्रारीनुसार, मोहसीन शेख याने कृष्णा वर्पे यांना फोन करुन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि ऑफिसचा पत्ता विचारुन धमकावल्याचं तक्रारीत म्हटलंय. याशिवाय महादेव आणि सचिन कुंभार याने या पत्रकाराच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह लिखाण केलं.

कृष्णा वर्पे यांना या तीन जणांकडून गेल्या अनेक दिवसांपासून त्रास दिला जात असल्याचं बोललं जातंय. पण वर्पे यांनी याकडे दुर्लक्ष केलं. अखेर कुटुंबातील सदस्यांवर आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे त्यांनी पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या ठिकाणी त्यांनी तिन्ही आरोपींविरोधात तक्रार देत पुरावे सादर केले. त्यानंतर पोलिसांनी या तिघांविरोधात भा.द.वि कलम 500, 507 तसेच आयटी अॅक्ट 67 नुसार गुन्हा दाखल केलाय.

सचिन कुंभार आणि मोहसीन शेख हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. तर या प्रकरणातील महादेव बालगुडे याच्याविरोधात मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी निधी कामदार यांचं बनावट फेसबुक अकाऊंट बनवून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. देव गायकवाड नावाच्या बनावट फेसबुक खात्याच्या माध्यमातून त्याने हे कृत्य केलं होतं. या गुन्ह्यात त्याला अटकही झाली होती.

Non Stop LIVE Update
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.