AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा जनता दरबार, आव्हाड सोमवारी, अजितदादांच्या भेटीचा दिवस कोणता?

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आता जनता दरबार घेणार आहेत (NCP starting Janta Darbar of Ministers).

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा जनता दरबार, आव्हाड सोमवारी, अजितदादांच्या भेटीचा दिवस कोणता?
| Updated on: Aug 20, 2020 | 5:56 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आता जनता दरबार घेणार आहेत (NCP starting Janta Darbar of Ministers). कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जनता दरबार बंद होता. मात्र, आता सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे मंत्री जनता दरबार सुरु करणार आहेत (NCP starting Janta Darbar of Ministers).

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्र्यांच्या जनता दरबाबाराचं अधिकृत वेळापत्रक ट्विटरवर जाहीर करण्यात आलं आहे. “काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी 31 ऑगस्टपासून वेळ देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे”, असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जिंतेद्र आव्हाड दुपारी 2 ते 4 या वेळेत जनता दरबार घेतील. तर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सायंकाळी 4 ते 6 या वेळेत जनता दरबार घेतील.

मंगळवारी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ सकाळी 10 ते 12, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे दुपारी 2 ते 4 तर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील सायंकाळी 4 ते 6 या वेळेत जनता दरबार घेतील.

बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे 10 ते 12, मंत्री दत्तात्रय भरणे दुपारी 2 ते 4 तर मंत्री प्राजक्त तनपुरे संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत जनता दरबार घेतील.

गुरुवारी ग्रामिकास मंत्री हसन मुश्रीफ सकाळी 10 ते 12, दुपारी 2 ते 4 या वेळेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे तर मंत्री दिलीप वळसे पाटील संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत जनता दरबार घेतील.

शुक्रवारी गृहमंत्री अनिल देशमुख सकाळी 10 ते 12, मंत्री आदिती तटकरे दुपारी 2 ते 4 आणि मंत्री संजय बनसोडे संध्याकाळी 4 ते 6 यावेळेत जनता दरबार घेतील.

हेही वाचा : IAS Transfer | चंद्रकांत पाटलांकडून सकाळी ‘ट्रान्सफर मंत्रालय’ अशी खिल्ली, दुपारी चार आयएएस अधिकाऱ्यांची बदली

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.