प्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

जगातील सर्व देशांच्या तुलनेत भारतातील खून प्रकरणात गेल्या अनेक वर्षांपासून घट होत आहे. पण प्रेम प्रकरणातील खून प्रकरणात मात्र 28 टक्क्यांची वाढ (Increase murder case in love) झाली आहे

प्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

मुंबई : जगातील सर्व देशांच्या तुलनेत भारतातील खून प्रकरणात गेल्या अनेक वर्षांपासून घट होत आहे. पण प्रेम प्रकरणातील खून प्रकरणात मात्र 28 टक्क्यांची वाढ (Increase murder case in love) झाली आहे, अशी माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो (NCRB) ने दिली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या अहवालामुळे सर्वत्र एकच खळबळ (Increase murder case in love) उडाली आहे.

एनसीआरबीच्या अहवालानुसार, वर्ष 2001 ते 2017 दरम्यान सर्वाधिक खून हे प्रेम प्रकरणातून झाले आहेत. या दरम्यान 28 टक्क्यांची (44,412) वाढ झाली आहे. तसेच प्रेम प्रकरणातून होणाऱ्या खुनांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि आंध्र प्रदेश हे पहिल्या स्थानावर आहेत. तर दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

देशातील केरळ आणि पश्चिम बंगाल सोडले, तर इतर सर्व राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहेत. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये प्रेम प्रकरणामुळे सर्वात कमी खून झाले आहेत. त्यामुळे हे राज्य पाचव्या स्थानावर आहेत.

“सर्वाधिक खून प्रेम प्रकरण किंवा अनैतिक संबंधामुळे झाले आहेत. याशिवाय 2017 मध्ये ऑनर किलिंगचे 92 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 2016 मध्ये 71 गुन्हे दाखल झाले होते. यामध्येही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे”, असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हणणं आहे.

एनसीआरबीमध्ये 2001 रोजी 36 हजार 202 खून रजिस्टर झाले आहेत. तर 2017 पर्यंत हा आकडा 21 टक्क्यांनी घटून 28 हजार 653 झाला होता. वर्ष 2001 ते 2017 च्या काळात 4.3 टक्के (67,774) खून वैयक्तिक वादातून झाले होते. तर 12 टक्के (51,554) खून जमिनीच्या वादातून झाले आहेत, असं टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI