चीनमध्ये ‘भरपेट’ खाणाऱ्यांना दणका, अतिखादाडांना 1 लाखांचा दंड, नवा कायदा लागू

Operation Empty Plate | अन्नाचा एकही कण वाया जाऊ नये यासाठी चीनच्या सरकारनं नवा कायदा केला आहे

चीनमध्ये 'भरपेट' खाणाऱ्यांना दणका, अतिखादाडांना 1 लाखांचा दंड, नवा कायदा लागू
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 2:29 PM

चीन : ‘प्लेटमध्ये भरमसाठ घ्या, हवं तेवढं खा, उरलं तर फेकून द्या…’ चीनमध्ये (China) हे यापुढं चालणार नाही. कारण, अन्नाचा एकही कण वाया जाऊ नये यासाठी सरकारनं नवा कायदा केला आहे. यामध्ये अन्न वाया घालवणाऱ्या हॉटेल्स-रेस्टॉरंटवर तब्बल  1 लाखांच्या दंडाची तरतूद आता चीनच्या सरकारनंच केली आहे. कोरोनाच्या संकटानंतर चीनमध्ये अन्नधान्याचा तुटवडा (Food Crisis) होऊ लागला आहे. हेच पाहता आता चिनी सरकारनं हे पाऊल उचललं आहे. यासाठी ऑपरेशन एम्प्टी प्लेट ( Operation Empty Plate) सुरु करण्यात आलं आहे. याद्वारे जेवण वाया घालवणाऱ्या नागरिकांसह हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर (Restaurants) कारवाई केली जाणार आहे.  सरकारनं दंडाची तरतूद केली आहे. (New law in China against food wastage)

ऑपरेशन एम्प्टी प्लेट अभियान ( Operation Empty Plate)

अन्नधान्याचं संकट दूर करण्यासाठी चीनच्या कम्युनिस्ट सरकारनं ऑपरेशन एम्प्टी प्लेट ही योजना आणली. याद्वारे लोकांना अन्न वाया घालवण्यापासून रोखणं, आहे त्या अन्नधान्यामध्ये देशाची गरज पूर्ण करणं आणि इतर देशातून होणारी अन्नधान्याची आयात कमी करणं हा उद्देश आहे. रात्री नागरिकांनी कमी जेवावं आणि इतर वेळी जेवणाच्या प्लेटमधील सगळं अन्न खावं. त्यामुळं ते वाया जाणार नाही आणि अन्नधान्याचा तुटवडा होणार नाही.

खादाडांच्या व्हिडीओवरही आता कारवाई

एक व्यक्ती 10-10 बर्गर खातो, 10 पिझ्झा (Pizza) खातो, एकाचवेळी प्लेटभर न्यूडल्स गुडूप करतो, असे व्हिडीओ चिनी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. चीनमध्ये ओव्हर इटींग (Over Eating) म्हणजेच जास्त खाण्याचे चॅलेंजेस (Food Challenge)लावले जातात, आणि त्याचे व्हिडीओ बनवले जातात. जगभरातही हे व्हिडीओ पाहिले जातात. मात्र, या व्हिडीओतून अन्नाच्या नासाडीचा संदेश जातो. त्यामुळं अशा व्हिडीओतील व्यक्तींवरही कारवाई करण्याचा पवित्रा चीनच्या कम्युनिस्ट सरकारनं घेतला आहे.

शी जिनपिंग यांचा अन्न वाया घालवणाऱ्यांना इशारा

‘तितकंच खा, जितकी तुम्हाला भूक (hunger) आहे’ असं म्हणत चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी खादाडांना इशारा दिला आहे. देशात अन्नसंकट आहे, त्यातच अन्न वाया घालवण्यात चीन जगात सर्वात आघाडीच्या देशांमध्ये आहे. त्यामुळं आता अन्न वाया घालवणाऱ्यांवर बंधनं आणणं गरजेचं असल्याचं जिनपिंग म्हणाले

टीव्ही चॅनल्सवरही सरकारची कारवाई

जे टीव्ही चॅनल्स खादाडांचे असे व्हिडीओ दाखवतील, असे चॅलेंजेंस दाखवतील वा कुठल्याही व्हिडीओतून अन्न वाया जातं आहे, असं दिसत असेल, त्या चॅनलवर सरकार कारवाई करणार आहे. या कारवाईत चॅनलला लाखो रुपयांच्या दंडापासून ते चॅनलचा परवाना रद्द करेपर्यंत शिक्षेची तरतूद असणार आहे. .

चीनला अन्नसुरक्षा कायद्याची गरज का?

कोरोना संकटाचा चीनच्या शेती क्षेत्राला मोठा फटका बसला, परिणामी, चीनममध्ये सध्या अन्नधान्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच चीनची लोकसंख्या जास्त असल्यानं, अन्नधान्याची गरजही मोठी आहे. मात्र, तरीही चीनमध्ये दरवर्षी तब्बल 3.5 कोटी टन अन्नधान्य वाया जातं. जे चीनच्या एकूण अन्नधान्याच्या उत्पादनाच्या 6 टक्क्याहूनही अधिक आहे. शिवाय, 1.80 कोटी टन अन्न इथं फेकण्यावारी जातं.

चीनची अन्नधान्याची परिस्थिती काय?

चीनच्या कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये चीनमद्ये 66 कोटी टन अन्नधान्याचं उत्पादन झालं. मात्र, चीनमधील अन्नधान्याची मागणी जास्त असल्यानं हे अपुरं ठरलं. परिणामी, चीनला भारताकडून 9 कोटी किलो तांदूळ खरेदी करावा लागला. गेल्या 30 वर्षात चीननं भारताकडून केलेली ही सर्वात मोठी आयात होती.

संबंधित बातम्या:

कोरोनामुळे चीनच्या चिंता वाढल्या, राजधानी बीजिंगमध्ये पुन्हा लॉकडाऊन

चीनच्या वुहानमधील कोरोना संसर्गाचं सत्य जगासमोर आणलं, महिला पत्रकाराला 4 वर्षांची शिक्षा

(New law in China against food wastage)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.