Nisarga Cyclone | रायगडमध्ये 3 जूनला जनता कर्फ्यू, आपत्ती व्यवस्थापनासह नॉन कोव्हिड रुग्णालयही उपलब्ध

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 3 जूनला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता (Nisarga Cyclone In Maharashtra) आहे.

Nisarga Cyclone | रायगडमध्ये 3 जूनला जनता कर्फ्यू, आपत्ती व्यवस्थापनासह नॉन कोव्हिड रुग्णालयही उपलब्ध
Follow us
| Updated on: Jun 02, 2020 | 11:27 AM

रायगड : महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 3 जूनला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता (Nisarga Cyclone In Maharashtra) आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. त्यामुळे  येत्या 48 तासात ‘निसर्ग’ चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर 3 जूनला घरातच राहून जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

या वादळाला तोंड देण्यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयार आहे. तसेच मच्छिमारांनाही समुद्रास जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणतीही जीवितहानी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

गृहमंत्र्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा

गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तयार ठेवण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या व्यक्ती कच्च्या घरात राहतात. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याबाबत दवंडी आणि लाउडस्पीकरद्वारे सांगण्यात आले आहे. यासाठी पक्की निवारा गृहे देखील तयार ठेवण्यात आली आहेत.

त्याशिवाय मच्छिमारांना समुद्रास जाण्यास मनाई करण्यात आली असून तटरक्षक दलाला देखील सूचना देण्यात आली आहे. वादळामुळे झाडे पडणे, भूसख्लन, जोरदार पाऊस यामुळे हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील विशेषत: सखल भागातील झोपडपट्टीवासियांना देखील स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नॉनकोविड रुग्णालये उपलब्ध

मदत आणि बचाव कार्य करताना कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नॉनकोविड रुग्णालये उपलब्ध करण्याचे निर्देश दिल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोविडसाठी तात्पुरतं उभारण्यात आलेल्या रुग्णालयांतील रुग्णांना देखील सुरक्षित स्थळी कसे हलविता येईल ते पाहण्यास सांगण्यात आले आहे.

आवश्यकता भासल्यास अधिक रुग्णालये उपलब्ध करणे. त्याठिकाणी जनरेटर्सची सुविधा करण्यासही सांगण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

एनडीआरएफ, एसडीआरएफ तैनात

या चक्रीवादळात मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या 16 तुकड्यांपैकी 10 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. एसडीआरएफच्या 6 तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही. तसेच पालघर आणि रायगड मधील रासायनिक कारखाने, अनु-ऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे.

मंत्रालयात देखील 24 तास नियंत्रण कक्ष सुरु असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या (Nisarga Cyclone In Maharashtra) आहेत.

संबंधित बातम्या : 

Cyclone Nisarga live : निसर्ग चक्रीवादळ, NDRF ची पथकं तैनात, समुद्र किनारी वादळापूर्वीची शांतता

चक्रीवादळाचा संभाव्य धोका, मुंबईकरांसाठी महापालिकेच्या महत्त्वाच्या सूचना

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.