निसानच्या ‘या’ कारची तुफान मागणी, उत्पादन वाढवण्यासाठी कंपनीकडून 1500 नव्या कर्मचाऱ्यांची भरती

शोरुममध्ये या गाडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज लोक या गाडीला पाहायला आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी करत आहे.

निसानच्या 'या' कारची तुफान मागणी, उत्पादन वाढवण्यासाठी कंपनीकडून 1500 नव्या कर्मचाऱ्यांची भरती
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 12:18 PM

मुंबई : भारतात गेल्या काही वर्षांपासून एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हींना चांगलीच पसंती मिळत आहे. त्यामुळे अनेक कार कंपन्या भारतीयांची मागणी आणि पसंती लक्षात घेत गाड्या डिझाईन करुन भारतीय मार्केटमध्ये लाँच करत आहेत. निसान कंपनीने 3 डिसेंबर रोजी Nissan Magnite ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतात लाँच केली होती. ही कार भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. या कारसाठी देशभरात खूप मोठी मागणी आहे. (Huge Demand for Nissan Magnite)

या कारसाठी देशभरातून प्रचंड मागणी असून वेटिंग पिरियडही खूप मोठा आहे. त्यामुळे कंपनी डिलर्ससोबत भागिदारी करत निसान मॅग्नाईट या कारचं उत्पादन (Production) वाढवण्यासाठी तब्बल 1 हजार 500 नव्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणार आहे. याबाबतची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. कंपनीने यापूर्वीच मॅग्नाईटचे उत्पादन वाढवलं होतं. त्याद्वारे कंपनी फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक महिन्याला 2 हजार 500 युनिट्स बनवू शकेल, अशी योजना बनवली होती. परंतु त्यानंतरही मागणी वाढतच आहे. त्यामुळे आता कंपनीने मॅग्नाईटच्या प्रत्येक महिन्याला 3 हजार 500 ते 4 हचार युनिट्स बनवण्याचं ध्येय ठेवलं आहे. त्यासाठीच कंपनी नव्या कर्मचाऱ्यांची भरती करत आहे. जेणेकरुन अधिक वेगाने गाड्या तयार होतील आणि कमीत कमी वेटिंग पिरियडवर ग्राहकांपर्यंत कार पोहोचतील. (Nissan, Dealer Partners to hire 1,500 workers to enhance production of Magnite SUV)

कंपनीने 2 डिसेंबर रोजी ही कार लाँच केली होती. आतापर्यंत या कारसाठी 32 हजार 800 बुकिंग्स आल्या आहेत. सध्या या कारसाठी 4 ते 6 महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे. तर या कारच्या टॉप व्हेरियंटसाठी तब्बल 8-9 महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे. निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव याबाबत म्हणाले की, आमची इच्छा आहे की, ग्राहकांना लवकरात लवकर मॅग्नाईट मिळावी. त्यामुळे या कारचं उत्पादन वाढवण्याच्या दिशेने आम्ही काम सुरु केलं आहे. आम्ही आमच्या प्रोडक्शन प्लांटमध्ये तिसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात केली आहे. तसेच प्लांटमध्ये 1 हजार हून अधिक नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

कार पाहण्यासाठी शोरुममध्ये गर्दी

लाँचिंगनंतर अवघ्या 15 दिवसात या कारने 15 हजार बुकिंग्सचा टप्पा पार केला होता. त्यानंतर आता आता अशी माहिती मिळाली आहे की, या कारच्या काही व्हेरियंट्ससाठी इतकी मागणी आहे की, त्या कारसाठी तब्बल 8 महिन्यांचा वेटिंग पीरियड आहे. याचाच अर्थ या कारला भारतीय मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे. शोरुममध्ये या गाडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज लोक ही गाडी पाहण्यासाठी आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी करत आहे, अशी माहिती दिल्लीतल्या काही डिलर्सनी दिली आहे. या कारच्या टॉप व्हेरियंटला सर्वाधिक मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

कशी आहे मॅग्नाईट?

कंपनीने ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही चार ट्रिममध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये XE, XL, XV आणि XV प्रिमियमसह एकूण 8 व्हेरिएंटचा समावेश असेल. मॅग्नाइटचे मायलेज 1.0 लीटर पेट्रोल 18.75kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (MT) वर 20kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (CVT) वर 17.7kmpl चे मायलेज देते. भारतात Nissan Magnite ची सुरूवातीची किंमत 4 लाख 99 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. निसान मॅग्नाइट ही एसयूव्ही 11 हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर बुक करता येईल.

निसान मॅग्नाईटच्या सर्व (10) व्हेरियंट्सच्या किंमती

1. Magnite XE – 4.99 लाख रुपये 2. Magnite XL – 5.99 लाख रुपये 3. Magnite XV – 6.68 लाख रुपये 4. Magnite XV Premium – 7.55 लाख रुपये 5. Magnite Turbo XL – 6.99 लाख रुपये 6. Magnite Turbo XV – 7.68 लाख रुपये 7. Magnite Turbo XV Premium – 8.45 लाख रुपये 8. Magnite Turbo XL CVT – 7.89 लाख रुपये 9. Magnite Turbo XV CVT – 8.58 लाख रुपये 10. Magnite Turbo XV Premium CVT – 9.35 लाख रुपये

दोन इंजिनांचा पर्याय

Nissan Magnite मध्ये दोन इंजिन ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल तर दुसरं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. या SUV चं नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन 999cc आहे, जे 6,250rpm वर 71 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करु शकेल आणि 3,500rpm वर 96nm इतकं पीक टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन मॅन्युअल गियरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह सादर करण्यात आलं आहे. दुसरं इंजिन 1.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 5,000 आरपीएम वर 99 बीएचपीची पॉवर आणि 2,800 आरपीएम वर 160 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं.

या एसयूव्हीच्या फिचर्समध्ये 8 इंचांची फ्लोटिंग टच स्क्रिन, 7 इंच टीएफटी मीटर, व्हॉइस रेकग्निशन, पुश बटन स्टार्ट, क्रुज कंट्रोल, 360 डिग्री अराऊंड व्ह्यू मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 6 स्पीकर ऑडियो, ऑटोमॅटिक एसी, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएमचा समावेश आहे.

Nissan Magnite मधील इतर खास फिचर्स

⦁ Nissan Magnite मध्ये Bi Projector LED हेडलँम्प्स देण्यात आले आहेत.

⦁ LED DRL, LED इंडिकेटर

⦁ 16 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स

⦁ व्हाइस रेकग्निशन, ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, हाइट अडजस्टेबल ड्राइवर सीट, क्रूज कंट्रोल, वायरलेस चार्जर आणि एयर प्यूरिफायर सह जबरदस्त फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.

‘या’ गाड्यांना टक्कर 

Nissan Magnite मार्केटमध्ये मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza), ह्युंदाई वेन्यू (Hyundai Venue), टाटा नेक्सॉन (Tata Nexon), फोर्ड इकोस्पोर्ट (Ford Ecosport), महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV 300), टोयोटा अर्बन क्रुझर (Toyota Urban Cruiser), होंडा WR-V (Honda WR-V) आणि नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या किया सोनेट (Kia Sonet) या कारशी थेट टक्कर होत आहे.

हेही वाचा

भारतीयांच्या मनात भरलेली Nissan Magnite क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?

15 हजार बुकिंग्सनंतर Nissan Magnite चा सर्वात कमी सर्विस कॉस्टचा दावा

देशभरातील कारप्रेमी वाट पाहात असलेली एसयूव्ही 7 जानेवारीला लाँच होणार

खास भारतीयांसाठी डिझाईन केलेल्या ‘या’ कारचा मार्केटमध्ये धुमाकूळ, 8 महिन्यांचा वेटिंग पीरियड

(Nissan, Dealer Partners to hire 1,500 workers to enhance production of Magnite SUV)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.