पालकमंत्री अमिताभ बच्चन आहे का? नितेश राणेंनी सरकारी अधिकाऱ्याला झाडलं, तासात न आल्यास मिरवणूक काढतो, धमकीचा व्हिडीओ व्हायरल

नितेश राणेंच्या दौऱ्यासाठी तलाठी, कृषी अधिकारी न आल्याने त्यांनी फोन करुन अधिकाऱ्यांना झापलं. धमकीचा हा व्हिडीओ सध्या सिंधुदुर्गात तूफान व्हायरल झाला आहे. 

पालकमंत्री अमिताभ बच्चन आहे का? नितेश राणेंनी सरकारी अधिकाऱ्याला झाडलं, तासात न आल्यास मिरवणूक काढतो, धमकीचा व्हिडीओ व्हायरल

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे सरकारी अधिकाऱ्यांना धमकावतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. पालकमंत्री म्हणजे अमिताभ बच्चन आहे का त्याला बघायसाठी जाताय, असं म्हणत शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना नितेश राणेंनी झापलं. तर तासाभरात लिंगडाळ गावात न आल्यास मिरवणूक काढण्याचा धमकीवजा इशाराही त्यांनी फोनवरुन एका अधिकाऱ्याला दिला. (Nitesh Rane threatens Government Officer in Sindhudurg Video goes Viral)

आमदार नितेश राणे यांनी काल देवगड-लिंगडाळ येथे शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. मात्र त्याचवेळी पालकमंत्री उदय सामंत यांचाही नुकसानग्रस्त शेतीचा पाहणी दौरा असल्याने सर्व अधिकारी पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी झाले होते. नितेश राणेंच्या दौऱ्यासाठी तलाठी, कृषी अधिकारी न आल्याने त्यांनी फोन करुन अधिकाऱ्यांना झापलं. धमकीचा हा व्हिडीओ सध्या सिंधुदुर्गात तूफान व्हायरल झाला आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

“लिंगडाळ गावामध्ये आलोय, इथे तुम्ही पोहोचलाही नाही आहात पंचनामे करायला. काय हजामत करायला ठेवलं आहे काय तुम्हाला? कसले पंचनामे सुरु आहेत? मी इथे लिंगडाळ गावामध्ये आहे. इथे तुमचा एक अधिकारी पोहोचलेला नाही. पुढच्या एक तासामध्ये पोहोचला नाही ना, मी तिथे येतो घ्यायला. एक तासामध्ये इथे लिंगडाळला ये आणि मला फोन कर. तू इथे आला नाहीस ना, आणतो बघ तुझी मिरवणूक कशी इथे.. उठ तिथून पहिला.. आणि लिंगडाळला ये आणि फोन कर मला.. नाटकं तुमच्या लोकांची” असं नितेश राणे फोनवर बोलताना या व्हायरल व्हिडीओमध्ये ऐकायला येतं

दुसऱ्या व्हिडीओमध्ये नितेश राणेंनी उदय सामंतांच्या दौऱ्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना झापल्याचं दिसतं. “अधिकाऱ्यांना खाली पाठव.. उगाच तिथे लाड नको पालकमंत्र्यांचे.. तुम्ही एक जण राहू शकता, बाकीच्या लोकांना पाठवा ना.. तो काय अमिताभ बच्चन आहे का त्याला बघण्यासाठी जाताय सगळे.. कोण नाही इथे.. बोलून घ्या अधिकाऱ्यांशी पंचनामे करायला लावा.. बिचाऱ्या लोकांची हालत आहे” असं नितेश राणे फोनवर बोलत असल्याचं ऐकू येतं. (Nitesh Rane threatens Government Officer in Sindhudurg Video goes Viral)

संबंधित बातम्या :

मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम, पोलीस भरतीवरुन नितेश राणे आक्रमक

(Nitesh Rane threatens Government Officer in Sindhudurg Video goes Viral)

Published On - 12:44 pm, Tue, 20 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI