बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपयांसाठी अर्जाची गरज नाही, फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार

बांधकाम मजुरांना अर्थसहाय्यासाठी कोणताही अर्ज किंवा कागदपत्रांची आवश्यकता नाही, असं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे (Financial help to Construction worker).

बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपयांसाठी अर्जाची गरज नाही, फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार
Follow us
| Updated on: Apr 23, 2020 | 7:21 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडॉऊन सुरु आहे. या कालावधीत राज्य सरकारने रोजगार बुडालेल्या इमारत आणि इतर बांधकाम मजुरांनात प्रत्येकी 2 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे पैसे थेट कामगारांच्या बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येत आहेत. बांधकाम मजुरांनी यासाठी कोणताही अर्ज, बँकेचा तपशील, आधार क्रमांक नव्याने सादर करण्याची आवश्यकता नाही, असं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे (Financial help to Construction worker). तसेच कामगारांना कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

संबंधित 2 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी अर्ज किंवा कागदपत्रांची आवश्यकता नाही. त्यामुळे कोणत्याही संघटना, संस्था अथवा व्यक्ती यांच्याकडून कामगारांना भूलथापा देऊन कागदपत्रांची मागणी होत असल्यास त्यांनी कामगार विभागाकडे किंवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कामगारांची फसवणूक केल्याचं निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असाही इशारा कामगार कल्याण मंडळाने दिला आहे.

जिल्हा कार्यालय स्तरावर गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बांधकाम कामगारांना थेट (DBT) पध्दतीने  रकमेचे वाटप करण्यात येत आहे. यासाठी संबंधित कामगारांची जिल्हा कार्यालयाकडून मंडळाच्या मुंबई येथील मुख्यालयात नोंद होणं आवश्यक आहे. बांधकाम कामगारांची यादी व बँकेचा तपशील मंडळस्तरावर मागवून अर्थसहाय्य वाटप करण्यात येत आहे. तसेच त्यास मंडळाच्या मुख्यालय स्तरावरुन 20 एप्रिल 2020 पासून सुरुवात झाली आहे, अशी माहिती इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीरंगम्  यांनी दिली.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनदरम्यान ज्वेलर्ससमोर खड्डा खणला, खुदाई करत करत भुयार बनवून ज्वेलर्स लुटलं

तळीरामांना धीर निघेना, सांगलीत वाईन शॉप फोडून दारुचे बॉक्स लंपास

कल्याण-डोंबिवलीत स्वतंत्र कोरोना लॅब, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ‘सीड मदर’ राहीबाई पोपेरे यांचा मोलाचा सल्ला

Financial help to Construction worker

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.