दिलासादायक ! राज्यात नव्या कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट

दिलासादायक ! राज्यात नव्या कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.76 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यूदर हा 2.64 टक्क्यांवर आला आहे.

prajwal dhage

|

Oct 10, 2020 | 11:41 PM

मुंबई : राज्यात शनिवरी (10 ऑक्टोबर) कोरोनासंदर्भात दिलासा देणारी आकडेवारी (number of covid patients in Maharashtra) समोर आली आहे. शनिवारी नव्या कोरोना रुग्णांपेक्षा दुप्पट रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात 11 हजार 416 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 26 हजार 440 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.76 टक्के आहे. तर शनिवारी दिवसभरात राज्यात 308 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्याचा मृत्यूदर हा 2.64 टक्क्यांवर आला आहे. (number of cured patients in Maharashtra is double than that of new corona virus cases)

राज्यात आतापआर्यंत 15 लाख नागरिकांना कोरोना

सध्या राज्यात 2 लाख 21 हजार 156 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 75 लाख 69 हजार 447 नमुन्यांपैकी 15 लाख 17 हजार 434 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिलेल्या नमुन्यांपैकी पॅझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण 20 टक्के आहे. राज्यात सध्या 22 लाख  68 हजार 57 संशयित होम क्वारंटाईनआहेत. तर 24 हजार 994 नागरिकांना  संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलंय. राज्यात शनिवारी 308 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्युदर 2.64 टक्के एवढा आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या पार

मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतेय. अनलॉकनंतर नवे कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाणही वाढले आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 27 हजारांवर पोहोचली आहे. तर मुंबईत एकूण 1 लाख 92 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या 9391 वर पोहोचली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नव्या कोरोना रुग्णांपेक्षा जास्त असली तरी, मुंबईसारख्या शहरात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील बरीच आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य प्रशासनाला ठाणे, मुंबई, पुणे या सारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखणे अजूनही आव्हानात्मकच असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या :

कोरोना व्हायरस मानवी त्वचेवर किती वेळ जिवंत राहतो? संशोधनात अंचबित करणारी माहिती समोर

डोनाल्ड ट्रम्प कोरोना व्हायरस घेऊन भारतात आले, संजय राऊत यांचा दावा

कोरोना व्हायरसची चेन तुटण्यास सुरुवात, लॉकडाऊनमुळं नेमका किती फायदा?

(number of cured patients in Maharashtra is double than that of new corona virus cases)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें