102 वर्षाच्या वृद्ध महिलेची कोरोनावर मात, उपचारानंतर कोरोनामुक्त

ब्रिटनमध्ये 102 वर्षाच्या एका वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली (old lady recover from corona) होती.

102 वर्षाच्या वृद्ध महिलेची कोरोनावर मात, उपचारानंतर कोरोनामुक्त


लंडन (इग्लंड) : ब्रिटनमध्ये 102 वर्षाच्या एका वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली (old lady recover from corona) होती. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या उपचारानंतर ही वृद्ध महिला बरी झाली आहे. या महिलेचे उपचार ब्रिटनमधील लिव्हरपूल येथील एण्ट्री रुग्णालयात सुरु होते. आता वृद्ध महिलेला डिस्चार्ज देऊन घरी सोडले (old lady recover from corona) आहे.

रुग्णालयातील सर्वाधिक वय असलेली कोरोना बाधित वृद्ध महिला बरी झाल्याने सर्व नर्स आणि डॉक्टरांनी टाळ्या वाजवून या महिलेचे स्वागत केले आहे.

“ही वृद्ध महिले रुग्णालयात दाखल होती तेव्हा सर्वांचे मनोरंजन करत होती. वॉर्डमधील प्रत्येकजण तिची आठवण काढत आहेत. उपचारानंतर बरे झाल्यानंतर वृद्ध महिलेला डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले आहे”, असं रुग्णालयाच्या मॅनजरने सांगितले.

सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचे 17 लाख 5 हजार एवढे रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये 1 लाख तीन हजार 230 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3 लाख 78 हजार 444 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत भारतात साडे सहा हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रात आतापर्यंत दीड हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संख्येनं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI