AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oscar winners 2020 : सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘पॅरासाईट’चा अनोखा विक्रम, हॉकिन फीनिक्स सर्वोत्तम अभिनेता

सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले (मूळ पटकथा) आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ऑस्करही पॅरासाईट सिनेमाने पटकावला.

Oscar winners 2020 : सर्वोत्कृष्ट चित्रपट 'पॅरासाईट'चा अनोखा विक्रम, हॉकिन फीनिक्स सर्वोत्तम अभिनेता
| Updated on: Feb 10, 2020 | 11:27 AM
Share

न्यूयॉर्क : जगभरात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘ऑस्कर’ पुरस्कारावर ‘पॅरासाईट’ चित्रपटाने नाव कोरलं आहे. दक्षिण कोरियाई ‘पॅरासाईट’ हा ‘ऑस्कर’वर नाव कोरणारा पहिलाच परभाषिक चित्रपट ठरला आहे. ‘जोकर’ चित्रपटातील भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता हॉकिन फीनिक्सने (Joaquin Phoenix) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. तर ‘ज्युडी’ चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या रेनी झेल्विगर (Renée Zellweger) हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर (Oscar The Academy Award Winners) जिंकला.

‘पॅरासाईट’साठी बोंग जून हो यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचाही ऑस्कर मिळाला. हा चित्रपट दोन कुटुंबांच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये दक्षिण कोरियातील आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि गरीब कुटुंबातील भेद दाखवण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले (मूळ पटकथा) आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ऑस्करही या सिनेमाने पटकावला.

अमेरिकेत कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये दरवर्षीप्रमाणे 92 व्या ऑस्करचा शानदार पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यंदाही ऑस्कर सोहळ्यात सूत्रसंचालनाच्या परंपरेला फाटा देण्यात आला. गेल्यावेळी प्रमाणेच थेट मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

‘जोकर’ चित्रपटाने सर्वाधिक 11 ऑस्कर नामांकनं मिळवली होती, परंतु या चित्रपटाला केवळ दोन पुरस्कारांवर नाव कोरण्यात यश आलं. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या हॉकिन फिनिक्स यांच्याशिवाय बेस्ट ओरिजिनल स्कोअर हा पुरस्कार ‘जोकर’साठी Hildur Guðnadóttir हिला मिळाला.

दहा नामांकन मिळवणाऱ्या ‘1917’ या चित्रपटालाही केवळ तीनच पुरस्कारांवर समाधान मानावं लागलं. हॉलिवूडचे दिग्गज छायाचित्रकार रॉजर डिकिन्स यांनी सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी कारकीर्दीतील दुसरा ऑस्कर पुरस्कार जिंकला. सॅम मेडेन्स दिग्दर्शित या चित्रपटामध्ये पहिल्या महायुद्धाचा काळ दाखवण्यात आला आहे.

ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी (Oscar The Academy Award Winners)

सर्वोत्कृष्ट चित्रपट – पॅरासाईट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बाँग जून हो (पॅरासाईट) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रेनी झेल्विगर (ज्युडी) सर्वोत्कृष्ट अभिनेता – हॉकिन फीनिक्स (जोकर) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लॉरा डर्न (मॅरेज स्टोरी) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ब्रॅड पिट (वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड) सर्वोत्कृष्ट मूळ गीत – आय अॅम गॉना लव्ह मी अगेन (रॉकेटमॅन) सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर – जोकर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट – पॅरासाईट सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा – जोजो रॅबिट सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – पॅरासाईट सर्वोत्कृष्ट केशभूषा आणि रंगभूषा – बॉम्बशेल सर्वोत्कृष्ट वेशभूषा – लिटील वूमन सर्वोत्कृष्ट दृश्य परिणाम – 1917 सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – 1917 सर्वोत्कृष्ट संकलन – फोर्ड व्हर्सेस फरारी सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण – 1917 सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन – फोर्ड व्हर्सेस फरारी सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट – लर्निंग टू स्केटबोर्ड इन अ वॉरझोन (इफ यू आर अ गर्ल) सर्वोत्कृष्ट माहितीपट – अमेरिकन फॅक्टरी सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट – हेअर लव्ह सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट – टॉय स्टोरी 4 सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन लघुपट – द नेबर्स विंडो सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड

Oscar The Academy Award Winners

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.