पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा, एकट्या महाराष्ट्राला 12 पुरस्कार

पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा, एकट्या महाराष्ट्राला 12 पुरस्कार

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा झाली आहे. माजी क्रिकेटर गौतम गंभीर, अभिनेता मनोज वाजपेयी, ज्येष्ठ अभिनेते कादर खान (मरणोत्तर), शंकर महादेवन, प्रभूदेवा, फुटबॉलपटू सनील छेत्री, कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यासह 94 जणांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

चार जणांना पद्मविभूषण

तीजान बाई, लोककला, छत्तीसगड

इस्माईन उमर गुल्ला, सार्वजनिक सेवा, जिबौती

अनिल कुमार नाईक, उद्योग-पायाभूत सुविधा, महाराष्ट्र

बाबासाहेब पुरंदरे, कला, महाराष्ट्र

14 जणांना पद्मभूषण

जॉन चेंबर्स, व्यापार-उद्योग तंत्रज्ञान, अमेरिका

सुखदेव सिंग धिंडसा, सार्वजनिक सेवा, पंजाब

प्रविण गोर्धन, सार्वजनिक सेवा, दक्षिण आफ्रिका

महाशय धरम पाल, व्यापार-अन्न प्रक्रिया उद्योग, दिल्ली

दर्शन लाल जैन, समाजसेवा, हरियाणा

डॉ. अशोक कुकडे, आरोग्य सेवा, महाराष्ट्र, लातूर

करिया मुंडा, सार्वजनिक सेवा, झारखंड

बुधादित्य मुखर्जी, कला, पश्चिम बंगाल

मोहनलाल नायर, कला-अभिनय-सिनेमा, केरळ

एस. नम्बी नारायणन, अंतराळ संशोधन, केरळ

कुलदीप नायर (मरणोत्तर), शिक्षण, पत्रकारिता, दिल्ली

बछेंद्री पाल, क्रीडा, उत्तराखंड

व्ही. के. शुंगलू, नागरी सेवा, दिल्ली

हुकूमदेव नारायण यादव, सार्वजनिक सेवा, बिहार

एकूण 94 जणांना पद्मश्री

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI