पाकिस्तानी पोलिसाला अनिल कपूरचा डायलॉग म्हणणं महागात

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरचा डायलॉग म्हणणे पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याच्या चांगलंच अंगलट आलं आहे. अनिल कपूरचा डायलॉग म्हटल्याने अधिकाऱ्याला नोकरीवरुन निलंबित करण्यात आले. पाकिस्तानच्या पाकपतानच्या कल्याणा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अरशद यांचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये पोलीस इन्स्पेक्टर अरशद हे अनिल कपूर यांच्या 2013 मध्ये आलेल्या ‘शूटआऊट अॅट वडाला’ या चित्रपटातील […]

पाकिस्तानी पोलिसाला अनिल कपूरचा डायलॉग म्हणणं महागात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरचा डायलॉग म्हणणे पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याच्या चांगलंच अंगलट आलं आहे. अनिल कपूरचा डायलॉग म्हटल्याने अधिकाऱ्याला नोकरीवरुन निलंबित करण्यात आले. पाकिस्तानच्या पाकपतानच्या कल्याणा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अरशद यांचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये पोलीस इन्स्पेक्टर अरशद हे अनिल कपूर यांच्या 2013 मध्ये आलेल्या ‘शूटआऊट अॅट वडाला’ या चित्रपटातील एक डायलॉग म्हणत आहेत.

‘दो वक्त की रोटी खाता हूं, पांच वक्त की नमाज पढता हूं… इससे ज्यादा मेरी जरुरत नहीं और मुझे खरीदने की तेरी औकात नहीं’, असा हा डायलॉग होता.अरशद यांचा हा डायलॉग व्हायरल झाला आणि तो त्यांच्या वरिष्ठांनी बघितला. त्यनंतर पाकपतानच्या जिल्हा पोलीस अधिकारी मारीक महमूद यांनी अरशदला सरळ सस्पेंड केले.एव्हढंच नाही तर यावर चौकशी करण्याचे आदेशही दिले.

भारतीय सिनेमातील डायलॉग म्हटल्याने शिक्षा मिळालेले अरशद हे काही एकटे नाही. काही दिवसांआधी पाकिस्तानच्या एअरपोर्ट सिक्युरिटी फोर्स म्हणजेच एएसएफने आपल्या महिला कर्मचाऱ्याला हिंदी गाणं गायल्याने कामावरुन काढून टाकले होते. या महिलेचाही एक व्हिडीओ समोर आला होता, यात ही महिला पाकिस्तानचा झेंडा असलेली टोपी घालून भारतीय गायक गुरु रंधावाचं ‘हाय रेटेड गबरु’ हे गाणं गात होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर करवाई करत नोकरीवरुन काढण्यात आले होते.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.