जगात जर्मनी, राज्यात परभणी, तब्बल 30 वर्षांचा विक्रम मोडला

परभणी: जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी असं म्हणतात. परभणीत काही ना काही हटके घडत असतं. मग ते मानवनिर्मित असो वा निसर्गनिर्मित. एकवेळ पेट्रोलमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक दराचा विक्रम नोंदवल्यानंतर, परभणीने आता नवा विक्रम केला आहे. परभणीने आता 9.5 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद करत, गेल्या 30 वर्षातील थंडीचा विक्रम मोडला आहे.  परभणीत काल 14 नोव्हेंबरला […]

जगात जर्मनी, राज्यात परभणी, तब्बल 30 वर्षांचा विक्रम मोडला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

परभणी: जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी असं म्हणतात. परभणीत काही ना काही हटके घडत असतं. मग ते मानवनिर्मित असो वा निसर्गनिर्मित. एकवेळ पेट्रोलमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक दराचा विक्रम नोंदवल्यानंतर, परभणीने आता नवा विक्रम केला आहे. परभणीने आता 9.5 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद करत, गेल्या 30 वर्षातील थंडीचा विक्रम मोडला आहे.

 परभणीत काल 14 नोव्हेंबरला 9.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदलं गेलं. त्यामुळे परभणी जिल्ह्यात बोचरी थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे.

सरासरी दरवर्षी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडी जाणवायला सुरुवात होते. तुलनेने यावर्षी लवकरच थंडीला सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिन्याचे सरासरी तापमान 12 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. यावर्षी कमी पाऊस झाल्याने हवामान कोरडे आहे. त्यामुळे झपाट्याने  तापमानात घट होत आहे. नोव्हेंबर महिन्यामधील सरासरी तापमानाचा मागील तीस वर्षांचा रेकॉर्ड 14नोव्हेंबर रोजी मोडीत निघाला. यादिवशी किमान तापमान 9.5 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.

हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यात कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहते. यावर्षी ते 33 अंशावर गेलं आहे. जानेवारी महिन्यामध्ये सहसा तापमान पडण्यास सुरुवात होते. मात्र यंदाच्या वर्षी नोव्हेंबरपासूनच सुरुवात झाली आहे. पुढील पाच दिवसात किमान तापमानात किंचीत वाढ होऊन तापमान 12 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान तर कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहील अशी शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वेध शाळेने वर्तविली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.