बॉक्स ऑफीसवर ‘पठाण’ वसुली, विकेण्डपर्यंत दोनशे कोटींचा गल्ला जमवणार,

अतुल कांबळे, Tv9 मराठी

Updated on: Jan 26, 2023 | 11:58 AM

ओटीटीवर जरी प्रेक्षक वळले असले तर थिएटरात जाऊन मोठ्या स्क्रिनवर चित्रपट पहाण्याचा मजा वेगळाच असल्याने प्रेक्षकांची पावले पुन्हा चित्रपट गृहांकडे वळली आहेत असे तरण आदर्श यांनी म्हटले आहे.

बॉक्स ऑफीसवर 'पठाण' वसुली,  विकेण्डपर्यंत दोनशे कोटींचा गल्ला जमवणार,
bollywood
Image Credit source: socialmedia

मुंबई : शाहरूख खान याने पुन्हा यशस्वी कम बॅक केले आहे, आपल्या पठाण या चित्रपटाद्वारे त्याला चांगली तगडी ओपनिंग मिळाले आहे. त्याचा पठाण चांगलाच कमाई करीत आहे. आता या विकेंड अखेर पठाण दोनशे कोटीपर्यंत कमाई करेल असे म्हटले जात आहे. किंग खान शाहरूख याचा पठाण चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगली ओपनिंग मिळवून कमाई करीत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशीच्या कमाईचे आधीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. ओपनिंगला या चित्रपटाने 51 कोटीची तगडी कमाई केली आहे. त्यामुळे पठाणने हिंदीतील आतापर्यंत पहिल्या दिवशीच्या कमाईचा बाहुबली-2 चा रेकॉर्ड तोडला आहे.

लॉंग विकेण्डचा फायदा 

शाहरूख खान, जॉन अब्राहम, दीपिका पडूकोण अशी स्टारकास्ट असलेला पठाण बॉक्स ऑफीसवर छप्परफाड कमाई करीत आहे. चित्रपट तज्ज्ञांच्या मते हा चित्रपट आता आठवडाअखेर दोनशे कोटींचा गल्ला जमवेल. हा चित्रपट बुधवारी प्रदर्शित केल्याने या चित्रपटाला पाच दिवसांचा चांगला लांबलचंक विकेण्ड मिळाला आहे. त्यातच गुरूवारी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीने हा चित्रपट बंपर कमाई करणार आहे. इतकेच नाही तर या विकेण्ड जगभरातील कमाईचा आकडा तीनशे कोटीचा पुढचा कमाईचा टप्पा गाठेल असे म्हटले जात आहे. चित्रपट ट्रेड अॅनालिस्ट असलेल्या तरण आदर्श यांच्या मते हा चित्रपट

पठाण पहिल्या दिवशी 35 कोटींची कमाई करेल असा अंदाज प्रदर्शक (exhibitors) अक्षय राठी यांनी वर्तविला होता.  तर चित्रपट ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी हा चित्रपट 40 कोटींची बोहनी करेल असे म्हटले होते. प्रत्यक्षात या चित्रपटाला चांगली ओपनिंग भेटत त्याने 51 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमातील काही दृश्ये चर्चेत आहेत. त्यात शाहरूखची एंट्री तसे शाहरूख-दीपिका आणि जॉन अब्राहम यांचा पाठलाग करण्याचे दृश्य तसेच शाहरूख सोबत भाईजान सलमानची एंट्रीने थिएटर डोक्यावर घेतले जात आहे. बेशरम रंग या गाण्याती दीपिका पडूकोण ही बिकनीच्या रंगावरून हा चित्रपट वादात सापडला होता.

ओटीटी असूनही सिनेमाकडे प्रेक्षक वळले

कोरोनाकाळानंतर साऊथच्या कांतारा, केजीएफने सारख्या चित्रपटांना गर्दी झाली तरी प्रेक्षक एका प्रोपर बॉलीवूड मसाला चित्रपटाची आतुरतेने वाट पहात होते असे या चित्रपटाला मिळालेला यशाने म्हटले जात आहे. या चित्रपटाने बॉलीवूडची साल 2023 ची चांगली सुरूवात झाली आहे. ओटीटीवर जरी प्रेक्षक वळले असले तर थिएटरात जाऊन मोठ्या स्क्रिनवर चित्रपट पहाण्याचा मजा वेगळाच असल्याने प्रेक्षकांची पावले पुन्हा चित्रपट गृहांकडे वळली आहेत असे तरण आदर्श यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI