जीवघेण्या खड्ड्यांमुळे कोमात गेलेल्या रुग्णाला जीवदान

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

राजेंद्र कांबळे, टीव्ही 9 मराठी, सांगली : राज्यातील खड्ड्यांचा प्रश्न दर दिवसाआड चर्चेला येतोच. या खड्ड्यांमुळे अनेकांनी आपला लाखमोलाचा जीव गमावला आहे. मात्र, सांगलीतील मिरजेत लाखमोलाचा जीव वाचवला आहे. एकीकडे जीव घेणारे खड्डे असताना, मिरजेतील हा खड्डा जीवदान देणारा ठरला आहे. नेमकं काय झालं? मिरजेतल्या कवठेमहांकाळ इथल्या विलास रामचंद्र जाधव या 79 वर्षीय वृद्धावर प्रकृती […]

जीवघेण्या खड्ड्यांमुळे कोमात गेलेल्या रुग्णाला जीवदान
Follow us

राजेंद्र कांबळे, टीव्ही 9 मराठी, सांगली : राज्यातील खड्ड्यांचा प्रश्न दर दिवसाआड चर्चेला येतोच. या खड्ड्यांमुळे अनेकांनी आपला लाखमोलाचा जीव गमावला आहे. मात्र, सांगलीतील मिरजेत लाखमोलाचा जीव वाचवला आहे. एकीकडे जीव घेणारे खड्डे असताना, मिरजेतील हा खड्डा जीवदान देणारा ठरला आहे.

नेमकं काय झालं?

मिरजेतल्या कवठेमहांकाळ इथल्या विलास रामचंद्र जाधव या 79 वर्षीय वृद्धावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे भारती रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यानच विलास जाधव हे कोमात गेले आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. विलास हे उपचारांना प्रतिसाद देत नाहीत, हे लक्षात येताच नातेवाईकांच्या जबाबदारीवर त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय रुग्णालयाने घेतला आणि जाधव कुटुंबीयांनी विलास यांना घरी घेऊन  जाण्याची तयारी केली.

गाडीतून त्यांना घेऊन जात असताना मिशन चौकातल्या स्पीडब्रेकर आणि भल्या मोठ्या खड्यात गाडी गेली आणि गाडीला जोरदार धक्का बसला. या हादऱ्यामुळे कोमात असलेले विलास जाधव हे लगेचच शुद्धीवर आले. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना लागलीच मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

विलास यांच्यावर आता मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली आहे.

लांबचा पल्ला गाठायचा असेल अन् रस्त्यात खड्डेच खड्डे असतील तर चालकाच्या पोटात खड्डाच पडतो. कारण गाडी चालवायची म्हणजे ती तारेवरची कसरतच असते. पण एका खड्ड्याने दूरच्या प्रवासाला निघालेल्या एका वृद्धाला पुन्हा कुटुंबाच्या जवळ नेलं आहे.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI