Payal Ghosh | पायल घोषची ‘टीवटीव’ पुन्हा सुरू, रिचा चड्ढाच्या वकिलावर नवा आरोप!

पायल घोषने काही स्क्रीन शॉट शेअर केले आहेत. यात तिने रिचाची वकील सवीना बेदीवर ट्रोलर्सला समर्थन केल्याचा आरोप केला आहे.

Payal Ghosh | पायल घोषची ‘टीवटीव’ पुन्हा सुरू, रिचा चड्ढाच्या वकिलावर नवा आरोप!

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केल्यानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) सध्या प्रत्येकावर आरोपांच्या फैरी झाडत सुटली आहे. नुकतीच तिने रिचा चड्ढाची माफी मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ही माफी मंजूर केल्याने रिचाने मानहानीची केस मागे घेतली होती. प्रकरण शांत झाले असे वाटत असतानाच पायल घोषने रिचाची वकील सवीना बेदीवर (Saveena Bedi) आरोप केले आहेत.(Payal Ghosh tweeted against Richa Chadha’s lawyer Saveena Bedi)

पायल घोषने काही स्क्रीन शॉट शेअर केले आहेत. यात तिने रिचाची वकील सवीना बेदीवर ट्रोलर्सला समर्थन केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणानंतर पायल मोठ्या प्रमाणावर ट्रोल होते आहे. इतके सगळे घडूनदेखील ती गप्प बसत नसल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्या ट्विटचे स्क्रीन शॉट शेअर करून पायलने रिचाची वकील या सगळ्यांचे समर्थन करत असल्याचे म्हटले आहे.

पायल घोषचे ट्विट

इरफान पठाणचे नाव घेत केली टीका

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषने आणखी एक नवा दावा केला होता. अनुराग कश्यप आणि तिच्यातील वादाबद्दल क्रिकेटपटू इरफान पठाणला माहिती असल्याचे तिने म्हटले होते.(Payal Ghosh tweeted against Richa Chadha’s lawyer Saveena Bedi)

पायल घोषने आपल्या ट्विटमध्ये इरफान पठाणला टॅग केले होते. या ट्विटमध्ये पायलने म्हटले की, ‘अनुराग कश्यपने माझ्यावर बलात्कार केल्याचे मी इरफान पठाणला सांगितले नाही. पण, अनुराग कश्यप आणि माझ्यातील वादाबद्दल इरफानला निश्चितच माहिती होते. माझा चांगला मित्र असल्याचा इरफान दावा करायचा, पण अनुराग आणि माझ्याबद्दल सगळे काही माहीत असूनही तो या वेळी गप्प आहे.’

पायल घोषच्या या ट्विटमुळे बालिवूडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पायल घोषने इरफान पठाणचे नाव घेतल्यानंतर आणखी काही ट्विट्स केले आहेत. ती आपल्या दाव्यावर ठाम असून ट्विटमध्ये इरफानसोबतचा फोटो शेअर केला आहे. 2014मध्ये होळीच्या एक दिवस आधी अनुराग कश्यपने तिला मेसेज केल्याचा दावा तिने केला आहे. त्यावेळी इरफान पठाण तिच्या घरी होता. तसेच इरफानमध्ये कसलेही स्वारस्य नसून अनुरागसोबतचा वाद माहीत असल्यामुळेच त्याचे नाव घेतल्याचे ती म्हणाली.

(Payal Ghosh tweeted against Richa Chadha’s lawyer Saveena Bedi)

Published On - 11:30 am, Mon, 19 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI