पाकिस्तानी चॅनलचाही तिळपापड, 15 ऑगस्टला काळा लोगो दाखवणार

सचिन पाटील

सचिन पाटील | Edited By: Namrata Patil

Updated on: Aug 12, 2019 | 8:13 PM

पाकिस्तानने येत्या 15 ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य दिनी सर्व पाकिस्तानी टीव्ही चॅनल लोगो ब्लॅक अँड व्हाईट ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानी चॅनलचाही तिळपापड, 15 ऑगस्टला काळा लोगो दाखवणार

इस्लामाबाद (पाकिस्तान) : जम्मू-काश्मीरमधून (jammu-kashmir) कलम 370 हटवल्यामुळे पाकिस्तानच्या पोटात दुखत असल्याचे दिसत आहे. हा कलम हटवल्यापासून पाकिस्तानने अनेकदा भारतावर टीका केली. तसेच त्यांनी समझौता एक्सप्रेस ट्रेनही बंद केली आहे. याशिवाय पाकिस्तानने येत्या 15 ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य दिनी सर्व पाकिस्तानी टीव्ही चॅनल लोगो ब्लॅक अँड व्हाईट ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटी अॅडव्हायजरने (PEMRA) याबाबतची परिपत्रक काढत याबाबतची माहिती दिली.

पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेट अथॉरिटीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, येत्या 15 ऑगस्टला सर्व पाकिस्तानी टीव्ही चॅनेलने आपला लोगो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ठेवा. तसेच चॅनेलमध्ये ईद-उल-जुहाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे प्री रेकॉर्डेड किंवा स्पेशल लाइव्ह प्रोग्राम टेलिकास्ट करु नका. असे म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरवरील 370 कलम हटवल्यामुळे PEMRA ने हा निर्णय घेतला आहे, असं पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेट अथॉरिटीने प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या सर्व टीव्ही चॅनेल्स, एफएम रेडिओ आणि डिस्ट्रीब्यूशन ऑपरेटर्स असा कंटेंट टेलिकास्ट केला जाईल ज्यामध्ये पाक-काश्मीरमध्ये बंधू-भाव दिसेल. PEMRA च्या माहितीनुसार  14 ऑगस्टला म्हणजे पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनादिवशी काश्मीरी लोकांसोबत बंधू-भाव म्हणून साजरा केला जाईल. तसेच 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणून पाळला जाईल. त्याशिवाय पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज हा अर्धवट फडकवला जाईल असेल, असं सांगितले जात आहे.

दरम्यान, यापूर्वीही कोणत्याही चॅनलच्या टॉक शोमध्ये भारतीय सेलिब्रिटी, राजकीय नेता आणि पत्रकारांना आमंत्रित करु नये. असे आदेश पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटी अॅडव्हायजरने (PEMRA) 8 ऑगस्ट रोजी निर्देश दिलं होते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI