10, 20, 30 नव्हे पंढरपुरात 50 लाखाची चिल्लर, विठ्ठल मंदिर प्रशासन बेजार

पंढरपूर : अनेक वेळा चिल्लरच्या पैशांवरुन बाजारात आणि सार्वजनिक व्यवहारात अडचणींना सामोरं जावं लागतं. अशाच वाढत्या चिल्लरच्या नव्या समस्येला पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला सामोरे जावं लागत आहे. कारण विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनाकडे थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 50 लाख रुपयांची चिल्लर आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाला चिल्लरची समस्या भेडसावत आहे. महत्त्वाचं म्हणजे चिल्लर स्वीकारण्यास बँकाही नकार […]

10, 20, 30 नव्हे पंढरपुरात 50 लाखाची चिल्लर, विठ्ठल मंदिर प्रशासन बेजार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

पंढरपूर : अनेक वेळा चिल्लरच्या पैशांवरुन बाजारात आणि सार्वजनिक व्यवहारात अडचणींना सामोरं जावं लागतं. अशाच वाढत्या चिल्लरच्या नव्या समस्येला पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला सामोरे जावं लागत आहे. कारण विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनाकडे थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 50 लाख रुपयांची चिल्लर आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाला चिल्लरची समस्या भेडसावत आहे. महत्त्वाचं म्हणजे चिल्लर स्वीकारण्यास बँकाही नकार देत आहेत.  त्यामुळे ‘कोणी चिल्लर घेता का चिल्लर’ असं म्हण्णयाची वेळ मंदिर समितीवर आली आहे.

वर्षभरात दानस्वरुपात आलेली जवळपास 50 लाखांची चिल्लर मंदिर समितीकडे पडून आहे. स्थानिक बँकांनी ही चिल्लर घेण्यास नकार दिल्यानं, मंदिर समितीसमोर या चिल्लरमुळे एक भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

गरिबांचा देव अशी ओळख असलेला विठ्ठल आर्थिकदृष्ट्या मात्र समृध्द झाला आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. विठ्ठलाच्या चरणी आपल्या ऐपतीनुसार एक रुपया, दोन रुपया, पाच रूपये, दहा रुपये अशा प्रकरचं नाण्यांच्या स्वरूपात दानही देतात. पण, आता हे चिल्लरच्या स्वरुपात येणारं दान कुठे खर्च करायचं हा प्रश्न मंदिर प्रशासनाला भेडसावत आहे.

वर्षाकाठी जमा होणारं 50 ते 60 लाख रुपयांचं दान हे बँक सुध्दा स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळे भाविकांच्या रकमेचे लाखो रुपयांचे व्याज बुडतंय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रक्कम मंदिरात ठेवणं हे जीकिरीचं आहे. आता ही रक्कम गरजू उद्योगात देण्याचा विचार समितीचा असून, कोणाला गरज असल्यास मंदिर समितीशी संपर्क साधण्याचं आवाहन मंदिर समितीनं केलं आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.