डॉक्टर तरुणीच्या मृत्यूच्या काही मिनिटे अगोदरच आरोपी पीएसआयने चक्क या व्यक्तीला केला व्हाट्सअप कॉल, हादरवणारी माहिती, तब्बल..
Phaltan Doctor Death case : फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी चक्क हातावर एक नोट लिहून आत्महत्या केली. या प्रकरणात अनेक खुलासे होत असून दोन आरोपी पोलिस कोठडीत आहेत. आता या प्रकरणात हैराण करणारी माहिती पुढे आलीये.

फलटण येथील वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या संपदा मुंडे यांनी तळहातावर एक नोट लिहित थेट आत्महत्या केली. पीएसआय गोपाळ बदने यांनी चार वेळा बलात्कार केला तर प्रशांत बनकर याने शारिरीक आणि मानसिक त्रास दिल्याचे नोटमध्ये संपदा मुंडे यांनी लिहिले. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर गंभीर आरोप केली जात आहेत. या प्रकरणात एसआयटीची स्थापना करावी, अशी थेट मागणी डॉक्टर तरूणीच्या कुटुंबियांनी केली. या प्रकरणात एका खासदाराचे नाव आल्याने राजकीय वळण संपूर्ण प्रकरणाला लागलंय. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर आरोपी पीएसआय फरार झाला होता. पोलिस दलातून बडतर्फ करण्याच्या इशाऱ्यानंतर तो पोलिसांना शरणागती आला. आता या प्रकरणातील अतिशय धक्कादायक अशी माहिती पुढे येतंय.
संपदा मुंडे प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने आणि दुसरा आरोपी प्रशांत बनकर संपर्कात होते. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या काही वेळ अगोदरच दोघांमध्ये संवाद देखील झाला होता. डॉक्टर महिलेनी आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाळ बदने या दोघांशी व्हाट्सअप कॉलवर संवाद झाला होता. नॉर्मल फोन करण्याऐवजी दोघांनी व्हाट्सअप कॉलवर एकमेकांसोबत संवाद साधला होता.
या प्रकारणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतली असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केले आणि कोर्टात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संपदा मुंडे हिच्या आत्महत्येच्या काही मिनिटे अगोदरच दोन्ही आरोपींमध्ये व्हाट्सअप कॉल झाल्याने संशय अधिकच वाढला आहे. संपदा मुंडेसोबत नेमके काय संबंध होते, हे सांगणे टाळताना पीएसआय बदने दिसतोय. हातावर लिहिलेली सुसाईड नोटमध्ये संपदा मुंडेचे हस्ताक्षर आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आज फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. मात्र, पोलिस तपासात दोन्ही आरोपी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पुढे आल्याने मोठी खळबळ उडाली. यासोबतच संपदाच्या मृत्यू अगोदर दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला, याचीही माहिती पोलिसांना घ्यायची आहे. आरोपी पीएसआय बदने पोलिस दलात असल्याने त्याला सर्व गोष्टींची जाण आहे की, चाैकशी कशी होणार, कोर्टात काय काय युक्तीवाद होऊ शकतात. यामुळे त्याच्याकडून काही गोष्टी कबूल करून घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे नक्कीच आहे.
