Pimpari Corona | पिंपरीत चिमुकली भावंडे कोरोनामुक्त, दीड महिन्याच्या बाळासह चार वर्षांच्या दादाकडून ‘फाईट’

पिंपरीत कोरोनाबाधित दीड महिन्याच्या बाळाने आणि त्याच्या 4 वर्षीय भावाने कोरोनावर मात केली आहे. 

Pimpari Corona | पिंपरीत चिमुकली भावंडे कोरोनामुक्त, दीड महिन्याच्या बाळासह चार वर्षांच्या दादाकडून 'फाईट'
Follow us
| Updated on: May 17, 2020 | 10:53 PM

पिंपरी : पिंपरीत कोरोनाबाधित दीड महिन्याच्या बाळाने आणि त्याच्या 4 वर्षीय (Two Brothers Fights Corona ) भावाने कोरोनावर मात केली आहे. पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून कोरोनाबाधित दीड महिन्याच्या बाळाला आणि त्याच्या 4 वर्षाच्या मोठ्या भावाला 14 दिवसांच्या उपचारानंतर सुखरुप घरी सोडण्यात आलं आहे. ते दोघेही कोरोना पाॅझिटिव्ह (Two Brothers Fights Corona ) होते.

मुंबईला डिलिव्हरीला गेलेली आई 1 महिन्यांनी पुण्याला परतली आणि बाळाला ताप आल्यामुळे वाय.सी.एम. रुग्णालय येथे दाखल केले. तेथे तपासणी केली असता बाळ आणि 4 वर्षीय मोठा भाऊ दोघेही कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच, आजोबासुद्धा कोरोना पाॅझिटिव्ह आले होते. तर आईचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील बालरोग विभागात त्यांच्यावर उपचार केले. त्यातून ते संपूर्ण बरे झाले आहेत. या दीड महिन्याच्या बाळासह त्याच्या चार वर्षांच्या भावाला पूर्ण बरे करण्यासाठी वैद्यकीय अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे आणि डाॅ. अनिकेत लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग विभागाने या (Two Brothers Fights Corona ) बाळांवर उपचार केले.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 200 पार

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा 200 पार गेला आहे. आज पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन 9 रुग्णांची भर पडली आहे. आज आढळेले रुग्ण हे दिघी, विकासनगर किवळे, चिंचवड, मोरे वस्ती चिखली परिसरातील आहेत. आतापर्यंत शहरातील 204 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 33 हजारांच्या पार

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 33  हजारांच्या पार पोहोचला आहे. आज राज्यात सर्वाधिक 2 हजार 347 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 33 हजार 053 वर पोहोचली आहे. राज्यात आज कोरोनाने 63 बळी घेतले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींचा आकडा 1 हजार 198 वर पोहोचला आहे.

Two Brothers Fights Corona

संबंधित बातम्या :

ससून रुग्णालयात तिघा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 185 वर

Pune Lockdown | पुण्यात सोमवारपासून घाऊक औषध विक्री सुरु, औषध विक्रीबाबत नियमावली जारी

Lockdown : हॉटेल व्यवसाय ठप्प, केंद्राकडे आर्थिक मदतीची पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांची मागणी

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढताच, बाधितांचा आकडा 3,795 वर

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.