Corona | पिंपरी-चिंचवडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, 193 दुकानदारांविरोधात गुन्हे

पिंपरी-चिंचवड परिसरात या आदेशाला न जुमानत अनेकांनी आपली दुकानं उघडली. या प्रकरणी काल दिवसभरात तब्बल 98 दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Corona | पिंपरी-चिंचवडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, 193 दुकानदारांविरोधात गुन्हे
Follow us
| Updated on: Mar 21, 2020 | 9:18 AM

पिंपरी : कोरोनाचा संसर्ग (Corona Virus) रोखण्यासाठी (Pimpari-Chinchwad Shut Down) अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काल मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच, यापूर्वीही सर्व अनेक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरातील दुकानं बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. मात्र, पिंपरी-चिंचवड परिसरात या आदेशाला न जुमानत अनेकांनी आपली दुकानं उघडली. या प्रकरणी काल दिवसभरात (Pimpari-Chinchwad Shut Down) तब्बल 98 दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दोन दिवसात एकूण 193 दुकानदारांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

पिपरी चिंचवड परिसरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न केल्याने तब्बल 98 दुकानदारांवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसात एकूण 193 दुकानदारांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हे दाखल करत कारवाई केली.

हेही वाचा : Corona Virus | मुंबई, पुणे, नागपुरातील व्यवहार ठप्प, राज्यातील 10 शहरं लॉक डाऊन

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर शट डाऊन

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यांसह जवळपास 10 शहरांचे व्यवहार आजपासून (21 मार्च) पुढील 10 दिवस ठप्प झाले आहेत. या शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, औषधे यासारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि कार्यालयांना टाळे लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. तर सरकारी कार्यालयातील 25 टक्के कर्मचारी उपस्थिती आहे.

मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड (Pimpari-Chinchwad Shut Down), नागपूर, अहमदनगर, यवतमाळ, रत्नागिरी, औरंगाबाद, उल्हासनगर या ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, MMRD, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूं व्यतिरिक्त सर्व दुकानं, सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील, असे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच सर्व शहरांमध्ये लॉक डाऊनची स्थिती पाहायला मिळाली.

कुठे काय चालू राहणार

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथे 31 मार्चपर्यंत खासगी ऑफिस आणि दुकानं बंद राहणार आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा म्हणजेच बँका, सार्वजनिक (Pimpari-Chinchwad Shut Down) वाहतूक, बाजारपेठा, किराणा मालाचे दुकान, दुधाचे दुकान, रुग्णालये, छोटे रेस्टॉरंट सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून सरकारकडून इतर सर्व अनावश्यक गोष्टी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Corona Virus | पुण्यातील पेट्रोल डीलर्स बंदला अर्धवेळ पाठिंबा, शहरातील सर्व पेट्रोल पंप दुपारनंतर बंद

कोरोनामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची चांदी, दर प्रतिटन 25 ते 30 हजार रुपयांवर

महाराष्ट्रात 25 ठिकाणी धाडी, 1.50 कोटींचे बनावट मास्क आणि सॅनिटायझर्स जप्त, प्रशासनाची धडक कारवाई

‘ना फेरफटका, ना मॉर्निंग वॉक’, नागपूर लॉकडाऊननंतर तुकाराम मुंढेंचे कडक नियम

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.