गुटखा खाऊन पचापचा थुंकला, भाजप नगरसेवकाला पोलिसांनी बदडला

पोलिसांनी अडवलं असतानाही गुटखा खात असलेला पिंपरी चिंचवडचा भाजप नगरसेवक गाडीतून उतरला आणि थेट पोलिसांसमोर रस्त्यावर थुंकला. (Pimpri Corporator Spits during Corona Pandemic)

गुटखा खाऊन पचापचा थुंकला, भाजप नगरसेवकाला पोलिसांनी बदडला

पिंपरी चिंचवड : राज्यात ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे. अशातच गुटखा खाऊन पचापचा थुंकणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या भाजप नगरसेवकाला पोलिसांनी चांगलाच बदडला. (Pimpri Corporator Spits during Corona Pandemic)

गुटखा खाऊन रस्त्यावर बिनधास्तपणे थुंकणे पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवकाला चांगलेच महागात पडलं आहे. संचारबंदी असूनही चार-पाच कार्यकर्त्यांना गाडीत घेऊन फिरणाऱ्या या नगरसेवकाला पिंपळे सौदागरमधील शिवार चौकात पोलिसांनी पकडले.

पोलिसांनी अडवलं असतानाही गुटखा खात असलेला हा नगरसेवक गाडीतून उतरला आणि थेट पोलिसांसमोर रस्त्यावर थुंकला. ‘कोरोना’चा फैलाव उघड्यावर थुंकणे, शिंकणे यातून होत असल्यामुळे पोलिस विशेष दक्षता बाळगत आहेत. ही बाब सहन न झालेल्या पोलिसांनी त्या नगरसेवकाला काठ्यांचा चांगलाच प्रसाद दिला.

केवळ अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांना बाहेर पडण्याची मुभा आहे. उन्हातान्हात जनसेवा करणाऱ्या पोलिसांसमोरच गुटखा खात थुंकण्याचा निलाजरेपणा या नगरसेवकाने दाखवला.

पोलिसांनी हिसका दाखवत ठाण्यात नेऊन नगरसेवकाला नोटीस बजावली. अखेर सांगवी पोलिसांची माफी मागितल्यानंतर या नगरसेवकाची सुटका झाली.

दरम्यान, उस्मानाबादमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाने उमरगा रुग्णालयात किळसवाणा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. कोरोनाबाधीत रुग्ण गुळण्या करुन थुंकणे, वॉर्डातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. उमरगा पोलीस ठाण्यात रुग्णाविरोधात कलम 188, 269 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

(Pimpri Corporator Spits during Corona Pandemic)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI