पिंपरी चिंचवडमध्ये शंभरीपार कोरोनाग्रस्त, रुपीनगरमध्ये 9 नवे रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?

पिंपरी चिंचवडमध्ये शंभरीपार कोरोनाग्रस्त, रुपीनगरमध्ये 9 नवे रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?

पिंपरी चिंचवड शहरातील एकूण कोरोनाबधितांचा आकडा 106 वर गेला आहे. आतापर्यंत चौघा कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत (Pimpri Chinchwad Ward wise Corona Patients)

अनिश बेंद्रे

|

Apr 28, 2020 | 12:29 PM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. आजच्या दिवसात (28 एप्रिल) आणखी दहा रुग्णांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या दहा जणांपैकी 9 रुग्ण एकट्या रुपीनगर भागातील आहेत. (Pimpri Chinchwad Ward wise Corona Patients)

पिंपरी चिंचवड शहरातील एकूण कोरोनाबधितांचा आकडा 106 वर गेला आहे. आतापर्यंत चौघा कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत, तर 29 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. म्हणजेच 73 अॅक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

दहा रुग्णांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचा अहवाल आज सकाळी आला. यामध्ये रुपीनगर भागातील सहा पुरुष आणि तीन महिला अशा नऊ रुग्णांचा समावेश आहे. रुपीनगर भाग दाट वस्तीचा असल्याने इथे कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

गेल्या चार ते पाच दिवसात रुपीनगर भागात तब्बल 26 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील ‘रुपीनगर’ हा कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट ठरला आहे.

याशिवाय खडकीमधील महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयात दाखल 50 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बधितांचा आकडा 106 वर गेला.

रुपीनगर परिसरात सापडलेले एकूण कोरोनाग्रस्त रुग्ण – 26

28 एप्रिल – 9 रुग्ण 27 एप्रिल – 5 रुग्ण 24 एप्रिल – 11 रुग्ण 23 एप्रिल – 1 रुग्ण

28 एप्रिलपर्यंत असलेल्या अॅक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह 70 रुग्णांची प्रभागनिहाय आकडेवारी (Pimpri Chinchwad Ward wise Corona Patients)

प्रभाग अ – निगडी, प्राधिकरण, आकुर्डी – 02

प्रभाग ब – काळेवाडी, चिंचवड, रावेत – 00

प्रभाग क – इंद्रायणीनगर, नेहरुनगर, अजमेरा कॉलनी – 07

प्रभाग ड – वाकड, पिंपळे – सौदागर, ताथवडे – 03

प्रभाग ई – भोसरी, मोशी, चऱ्होली – 22

प्रभाग फ – यमुनानगर, तळवडे, चिखली – 26

प्रभाग ग – पिंपरी, थेरगाव, रहाटणी – 05

प्रभाग ह – दापोडी, कासरवाडी, सांगवी – 05

(Pimpri Chinchwad Ward wise Corona Patients)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें