AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : कोरोनाच्या लढ्यात मोदींना आईचा आशीर्वाद, हिराबेन यांच्याकडून 25 हजारांची मदत

कोरोनाविरुद्धच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम केअर्सला त्यांच्या आई हिराबेन यांनीही पाठिंबा दिला आहे.

Corona : कोरोनाच्या लढ्यात मोदींना आईचा आशीर्वाद, हिराबेन यांच्याकडून 25 हजारांची मदत
| Updated on: Mar 31, 2020 | 11:04 PM
Share

अहमदाबाद : कोरोनाविरुद्धच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Mother Hiraben Help) यांच्या पीएम केअर्सला त्यांच्या आई हिराबेन यांनीही पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या पीएम केअर्स फंडला आई हिराबेन यांनी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. हिराबेन यांनी ही रक्कम त्यांच्या बचतमधून जमलेल्या पैशातून केली आहे. हिराबेन या सध्या गुजरातमध्ये कुटुंबासोबत राहतात. त्या नेहमी (PM Modi Mother Hiraben Help) टीव्हीवर मुलगा नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांचं समर्थन करताना दिसतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांनी सोमवारी ही रक्कम पीएम केअर्स फंडमध्ये दान केली. हे फंड मोदींनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी उभारलं आहे. जगभरातील अनेक लोक यामध्ये त्यांची मदत पाठवत आहेत. अनेक उद्योजक आणि सेलिब्रिटींनी आपली मदत दिली. यादरम्यान पंतप्रधानांच्या आईनेही त्यांची एक छोटीशी मदत दिली. याबाबत सोशल मीडियावर त्यांचं कौतुक केलं जात आहे.

कामगारांनाही सलाम केला

यापूर्वी हिराबेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Modi Mother Hiraben Help) आवाहनाला समर्थन देत जनता कर्फ्यूच्या (Janta Curfew) दिवशी कोरोनाशी लढणाऱ्या सर्व कामगारांच्या योगदानाला सलाम केला होता. त्यांनी घराबाहेर थाळी वाजवत कामगारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. वृद्धापकाळातही आपल्या आईच्या या उत्साहाला पाहता पंतप्रधान मोदींनी त्यांचा व्हिडीओ ट्विट केला होता.

जगभरातून लोक मदतीला सरसावले

पीएम केअर्स फंडमध्ये आतापर्यंत देशातील आणि जगातील हजारो लोकांनी त्यांनी मदत पाठवली आहे. यामध्ये सिनेकलाकार ते प्रसिद्ध उद्योगपतींपर्यंत सर्वांचा समावेश आहे.

पीएम मोदींच्या अपीलवर IAS असोसिएशनने पीएम केअर्स फंडसाठी 21 लाख रुपयांची मदत दिली. या असोसिएशनचे सर्व सदस्य त्यांचं एका दिवसाचं वेतन दान करणार आङेत. याशिवाय सीबीआय अधिकारी त्यांचे एक दिवसाचे पगार पीएम केअर्स फंडामध्येही देतील.

PM Modi Mother Hiraben Help

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.