AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत 36 लाखांनी वाढ; अमित शहांना शेअर बाजाराचा फटका

एकीकडे मोदींची संपत्ती वाढली तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांना शेअर बाजारातील चढ-उतारामुळे मोठा फटका बसला आहे.

पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत 36 लाखांनी वाढ; अमित शहांना शेअर बाजाराचा फटका
बेरोजगारीचे प्रमाण वाढवण्यासाठी विरोधकांकडून मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न सुरू होता. पण या सगळ्यात नुकत्याच समोर आलेली आकडेवारीनुसार ही सरकारच्या बाजूने आहे.
| Edited By: | Updated on: Oct 15, 2020 | 2:38 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे. 30 जून 2020 रोजी मोदींची एकूण संपत्ती 2.85 कोटी रुपये एवढी झाली आहे. 2019 च्या तुलनेत त्यांच्या सपत्तीत यंदा तब्बल 36 लाखांनी वाढ झाली आहे. यामुळे आता पंतप्रधानांसह सर्व कॅबिनेट मंत्र्यांनाही संपत्तीचा लेखाजोखा जाहीर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. एकीकडे मोदींची संपत्ती वाढली तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांना शेअर बाजारातील चढ-उतारामुळे मोठा फटका बसला आहे. (pm narendra modi richer in this year but amit shah loses net worth)

कशी वाढली पंतप्रधान मोदींची संपत्ती? मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती 2.49 कोटी रुपये होती. अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आणि शेअर बाजारातही चढ-उतार असताना मोदींची संपत्ती कशी वाढली? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. खरंतर, पंतप्रधान मोदी यांची संपत्ती बँका आणि अनेक इतर सुरक्षित साधनांमध्ये गुंतवणूक झाल्यामुळे वाढली आहे. बँकांमधून त्यांना तब्बल 3.3 लाख परतावा मिळाला आहे. तर इतर साधनांमधून 33 लाख रुपये मिळाले आहेत.

किती आहे रोख रक्कम? यंदाच्या जून महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान मोदी यांच्याकडे रोख रक्कम फक्त 31,450 रुपये होती. त्यांच्याकडे गांधी नगरमध्ये NSC ब्रँचच्या SBI खात्यामध्ये 3,38,173 रुपये जमा आहेत. या खात्याच्या एफडीआर आणि एमओडीमध्ये त्यांचे 1,60,28,939 रुपये जमा आहेत. त्यांनी डाक विभागात नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC) मध्ये तब्बल 8,43,124 रुपये जमा केले आहेत. जीवन विमा पॉलिसीमध्ये 1,50,957 रुपये आणि टॅक्स सेव्हिंग्स इन्फ्रा बॉन्डमध्ये 20,000 रुपये लावले आहेत. अशा प्रकारे त्यांची एकूण जंगम मालमत्ता 1.75 कोटी रुपये आहे.

HDFC बँकेचा ग्राहकांना मोठा झटका, मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात

मोदींकडे कोणतीही गाडी नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतंही कर्ज घेतलेलं नाही. त्यांच्या नावावर एकही गाडी किंवा इतर वाहन नाही. मोदींकडे तब्बल 45 ग्रॅम सोन्याच्या 4 अंगठ्या आहेत, ज्याची किंमत 1.5 लाख रुपये आहे. (pm narendra modi richer in this year but amit shah loses net worth)

किती आहे स्थावर संपत्ती? मोदींकडे संयुक्त मालकीचा गांधीनगरच्या सेक्टर-1 मध्ये तब्बल 3531 चौरस फुटांचा एक प्लॉट आहे. हा प्लाॉट 4 लोकांच्या संयुक्त नावावर असून उर्वरित तिघांची 25-25 टक्के भागिदारी आहे. ही मालमत्ता 25 ऑक्टोबर 2002 ला खरेदी करण्यात आली होती. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होण्याच्या 2 महिने आधी याची किंमत फक्त 1.3 लाख रुपये होती. पण आता मोदींच्या एकूण स्थावर संपत्तीची किंमत 1.10 कोटींवर गेली आहे.

Gold Price: दोन दिवसांत 1000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा आजचे नवे दर

किती आहे गृहमंत्री अमित शहा यांची संपत्ती? गृहमंत्री अमित शहा हे गुजरातच्या एका श्रीमंत कुटुंबातून आहेत. पण शेअर बाजारात चढ-उतार होत असल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झांल आहे. . जून 2020 पर्यंत अमित शहा यांची घोषित संपत्ती 28.63 कोटी होती. मागच्या वर्षी भाजपच्या अध्यक्षांच्या रुपात त्यांनी आपली संपत्ती 32.3 कोटी घोषित केली होती.

(pm narendra modi richer in this year but amit shah loses net worth)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.