Marathi News » Business » Gold price today silver price today 15 october 2020 gold fall for second time in 3 days
Gold Price: दोन दिवसांत 1000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा आजचे नवे दर
अमेरिकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांआधी काही अनुदानपर घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत.
एमसीएक्सवर, आज सुरुवाती बाजारात डिसेंबरच्या सोन्याचा वायदा भाव 0.4 टक्क्यांनी कमी होत 50,360 प्रति 10 ग्रॅमवर आला आहे तर डिसेंबरच्या चांदीचा वायदा भाव 0.9 टक्क्यांनी घसरत 61,064 प्रति किलोग्रॅमवर आला आहे.
2 / 9
मागच्या सत्रात सोन्यामध्ये 0.5 टक्क्यांनी घसरण झाली आहे चांदीने 1.6 टक्क्यांनी उडी घेतली आहे.
3 / 9
जागतिक बाजारात, आज सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकी डॉलरमुळे आज सोन्यावर दबाव होता.
4 / 9
डॉलर इंडेक्स 93.435 च्या उच्च स्तरावर पोहोचला आहे. परदेशी बाजारात सोनं 0.4 टक्क्यांनी घसरून 1,893.17 डॉलर प्रति औंसवर गेलं आहे. तर इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 1 टक्क्यांनी घसरत 24.05 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. प्लॅटिनम 0.3 टक्क्यांनी घसरत 854.59 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे.
5 / 9
मोतीलाल ओसवाल फायनेंशिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सोनं डिसेंबरच्या वायदा भावात 50,100 रुपयांनी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
6 / 9
49,900 रुपयांवर स्टॉपलॉस ठेवा आणि एक ते दोन सत्रांमध्ये 50,700 रुपये प्रति 10 ग्रॅम असं सोनं खरेदी करा.
7 / 9
चांदीही डिसेंबरच्या वायदा भावामध्ये 60,750 रुपये दराने खरेदी करा. 60,200 रुपयांवर स्टॉपलॉस लावा आणि दोन सत्रांमध्ये 61,900 रुपयांनी चांदी खरेदी करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
8 / 9
दरम्यान, आता सोन्याचे भाव जरी कमी असले तरी दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमती मोठ्या झपाट्याने वाढतील. दिवाळीपर्यंत सोनं 50000-52000 रुपये प्रति 10 ग्रॅम होण्याची शक्यता आहे.