पळपुट्या नीरव मोदीला अखेर लंडनमध्ये बेड्या

लंडन: पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबी ( PNB scam ) घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदीला (Nirav Modi) लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. भारतात पंजाब नॅशनल बँकेला 13000 कोटी रुपयांचा चुना लावून पसार झालेल्या नीरव मोदीविरोधात लंडन सरकारने अटक वॉरंट जारी केला होतं. आज त्याला अटक करण्यात आली. लंडन पोलीस त्याला आज 3.30 वाजता कोर्टात हजर करणार […]

पळपुट्या नीरव मोदीला अखेर लंडनमध्ये बेड्या
युके हायकोर्टाकडून नीरव मोदीला मोठा झटका
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

लंडन: पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबी ( PNB scam ) घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदीला (Nirav Modi) लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. भारतात पंजाब नॅशनल बँकेला 13000 कोटी रुपयांचा चुना लावून पसार झालेल्या नीरव मोदीविरोधात लंडन सरकारने अटक वॉरंट जारी केला होतं. आज त्याला अटक करण्यात आली. लंडन पोलीस त्याला आज 3.30 वाजता कोर्टात हजर करणार आहेत.  हजारो कोटींचं कर्ज बुडवून, परदेशात फरार झालेला डायमंड किंग निरव मोदी (Nirav Modi) काही दिवसांपूर्वीच लंडनमध्ये खुलेआम फिरताना आढळला होता.

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे अधिकारी लंडनमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते.  गेल्यावर्षी पीएनबी घोटाळा समोर आल्यानंतर निरव मोदी भारतातून पसार झाला.

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणानंतर भारतीय संस्थांना लंडनच्या कायदेशीर प्रक्रियेचा अंदाज आला आहे. त्याचा फायदा नीरव मोदीच्या प्रत्यार्पण प्रक्रियेत होऊ शकतो. त्यामुळे नीरव मोदी हा लवकरच भारताकडे सोपवलं जाऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी नीरव मोदी लंडनमध्ये फिरताना दिसला होता. सध्या लंडनमध्ये तो ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो आहे, त्या अपार्टमेंटची किंमत 70 कोटी रुपये आहे. ज्याचं भाडं महिन्याला 16 लाख रुपये आहे. इंग्लंडमधील माध्यमांच्या माहितीनुसार, नीरवने पुन्हा हिऱ्याचा व्यापार सुरु केला आहे.

मुंबईच्या विशेष न्यायालयाने नीरव मोदीची पत्नी अमी मोदी विरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्यांनी 3 कोटी डॉलर ट्रान्सफर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बँकेच्या खात्याचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे पैसे बँकेतून घेण्यात आलेल्या कर्जाचे असल्याचा संशय आहे. या पैशांनी न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये एक मालमत्ता खरेदी करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

पळपुटा निरव मोदी लूक बदलून लंडनमध्ये! 

ये दिवार आज तो जरुर टूटेगी! निरव मोदीचा बंगला स्फोट करुन पाडणार  

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.