AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील ‘कोरोना’मुक्त दाम्पत्यावर राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांची भावनिक कविता

पुणे जिल्‍ह्यात कोरोनाच्‍या ज्‍या दोन व्‍यक्‍ती अॅडमिट झाल्‍या होत्‍या, त्‍यांच्‍या दोन्‍ही टेस्‍ट निगेटीव्‍ह आल्‍या आहेत, त्‍यामुळे आज त्‍यांना डिस्‍चार्ज मिळाला. (Poem on Corona Free Pune Couple)

पुण्यातील 'कोरोना'मुक्त दाम्पत्यावर राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांची भावनिक कविता
| Updated on: Mar 25, 2020 | 1:46 PM
Share

पुणे : राज्यातील पहिले कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या दाम्पत्याला डिस्चार्ज दिल्यानंतर राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी आपल्या भावना कवितेच्या माध्यमातून मांडल्या आहेत. लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाचा सेलिब्रेशनसाठी हे पुण्याचे दाम्पत्य दुबईला गेले होते. नायडू हॉस्पिटलमधून पोलिस बंदोबस्तात कोरोनामुक्त झालेलं दाम्पत्य घरी गेले. परिसरातील लोकांचा विरोध होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त दिला जाणार आहे. पुढील 14 दिवस हे दाम्पत्य घरीच राहणार आहे. (Poem on Corona Free Pune Couple)

महाराष्ट्रातील पहिल्या करोना रुग्णाचे नाव ‘जीवनधर’ (खरं म्हणा की खोटं, नाही तर बदलून ठेवलेलं म्हणा)

सहजीवनाची पंचविशी साजरी करायला तो तिच्यासवे दुबईला गेला आणि जगभर थैमान घालत असलेला करोना या जीवनधराचा हात धरुन इथवर आला हा योगायोग ‘विचित्र’ नाही तो मोठा अर्थपूर्ण आहे

सुक्ष्मरुप धारण करुन मृत्यू अवतीभवती वावरत असताना जगण्यावरली आपली श्रद्धा बळकट करणारा ‘योगायोग’ आहे हा…! It reaffirms our faith in life. जगणं असं आतून मुसंड्या मारत असतं अवखळ खोंडाने गाईला लुचावं तसं ! 

आज हा जीवनधर खडखडीत बरा होऊन घरी परततोय… ‘अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी,’ हे उच्च रवाने सांगावं असा क्षण आहे हा… लोकांनी गुढ्या उभारल्याहेत.. कडुनिंबाला मोहर आलाय .. फांदीफांदीवर कोवळी पालवी फुटलीय … 

निर्जन रस्त्यांना उत्फुल्ल जगण्याची वसंतमाखली स्वप्नं पडताहेत ! ‘ फुलून येता फूल बोलले, मी मरणावर हृदय तोलले ‘ दुरुन कुठून तरी गाणं कानावर येतंय … तुम्ही ऐकताय ना ? आपणही आपल्या तारा छेडायला हव्यात…!

– प्रदीप आवटे 

पुणे जिल्‍ह्यात कोरोनाच्‍या ज्‍या दोन व्‍यक्‍ती अॅडमिट झाल्‍या होत्‍या, त्‍यांच्‍या दोन्‍ही टेस्‍ट निगेटीव्‍ह आल्‍या आहेत, त्‍यामुळे आज त्‍यांना डिस्‍चार्ज मिळाला. ‘दुसऱ्या दिवशी जे तीन पेशंट अॅडमिट झाले होते, त्‍यांच्‍या पहिल्‍या टेस्‍ट निगेटीव्‍ह आल्‍या आहेत, आज त्‍यांच्‍या दुसऱ्या टेस्‍ट घेत आहोत, त्‍या निगेटीव्‍ह आल्‍या तर त्‍यांनाही उद्या डिस्‍चार्ज दिला जाईल’, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिली. गुढीपाडव्‍याच्‍या शुभेच्‍छा देतानाच सर्वांच्‍या मदतीने कोरोनावर मात करु, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

पुणे विभागातील कोरोनाच्‍या सद्यस्‍थ‍ितीची माहिती देताना विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, ‘पुणे विभागात एकूण 825 नमुने घेतले होते, त्‍यापैकी 737 चे अहवाल प्राप्‍त झाले. यामध्‍ये 692 अहवाल निगेटीव्‍ह आले आहेत तर 37 अहवाल पॉझिटीव्‍ह आले आहेत. याचा अर्थ जवळ-जवळ 90 टक्‍के अहवाल निगेटीव्‍ह आलेत, ही समाधानाची बाब आहे.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित केला आहे. त्‍याचे नागरिकांनी कुठेही उल्‍लंघन करु नये, असे आवाहन करुन ते म्‍हणाले, या 21 दिवसांत आपल्‍या सर्वांची साथ, सर्वांचे सहकार्य या परिस्थितीवर मात करण्‍यासाठी मदत करु शकते. कोणत्‍याही जीवनावश्‍यक वस्‍तू म्‍हणजे औषध, भाजीपाला, अन्‍नधान्‍य आपल्‍यापर्यंत पोहोचवण्‍याचा आमचा आटोकाट प्रयत्‍न राहील, प्रशासन यासाठी नियोजन करत आहे. आपण या नियोजनाला सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. म्‍हैसेकर यांनी केले.

आरोग्‍य यंत्रणेने पहिले दोन पेशंट बरे व्‍हावे, यासाठी रात्रंदिवस अथक प्रयत्‍न केले. पुणे, पिंपरी चिंचवड तसेच विभागाच्‍या इतर जिल्‍ह्यातील अधिकारी हे कोरोनाच्‍या प्रतिबंधासाठी काम करत आहेत. या सर्वांचे त्‍यांनी कौतुक केले. तसेच काही कर्मचारी आदेशाचे उल्‍लंघन करुन निघून जात असतील तर त्‍यांच्‍यावर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशाराही डॉ. म्‍हैसेकर यांनी दिला.

या संकट समयी कुठेही डगमगून जाऊ नका, आपण सर्व एकत्र मिळून कोरोनावर मात करु या, असे आवाहन करुन स्‍वत:ला सुरक्षित ठेवा, त्‍याच बरोबर सगळयांना सुरक्षित ठेवा, असेही डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले. (Poem on Corona Free Pune Couple)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.