पोलिसासह तिघांचा विधवेवर बलात्कार, तिघांना अटक

छत्तीसगड येथे एका विधवा मिहलेवर सामूहिक बलात्कार करण्यात (Police rape on widow women) आला. ही घटना महासमुंद येथे घडली.

पोलिसासह तिघांचा विधवेवर बलात्कार, तिघांना अटक

रायपूर : छत्तीसगड येथे एका विधवा मिहलेवर सामूहिक बलात्कार करण्यात (Police rape on widow women) आला. ही घटना महासमुंद येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे या चार आरोपींपैकी एक पोलीस आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर शशांक शर्मा (पुलिस शिपाई), के.पी. पटेल (शिक्षक), रज्जो भारती आणि जयनारायण भोई या चार आरोपींना (Police rape on widow women) अटक करण्यात आले आहे.

“ज्या दिवशी घटना घडली त्या रात्री माझी मुलं रायपूरमध्ये मामाकडे गेले होते. त्यावेळी आरोपींनी माझ्यावर अत्याचार केला. नराधमांनी अत्याचार करताना व्हिडीओही बनवला. तो व्हिडीओ दाखवून ते सतत मला ब्लॅकमेल करत होते. यासोबत त्यांनी मला जीवे मारण्याची धमकीही दिली होती”, असं महिलेने पोलिसांना सांगितले.

“माझ्यावर चौघांनी ऑक्टोबर 2019 मध्ये पहिल्यांदा सामूहिक अत्याचार केला होता. यामध्ये जयनारायण भोई, शशांक शर्मा, केपी पटेल आणि रज्जो भारती यांचा समावेश होता”, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

“आरोपींची माझ्या मुलीवर वाईट नजर होती. आरोपींनी व्हिडीओ व्हायरल करण्यासोबत जीवे मारण्याची धमकी आणि मुलीचे अपहरण करु, अशी धमकी दिली”, असा आरोपही पीडित मिहलेने केला आहे.

Published On - 12:00 pm, Sat, 7 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI