AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rocky Dog | पूरग्रस्तांना ‘रॉकी’ची मदत, बचावकार्यात बदमाशी करणाऱ्यांवर वचक

पुराने जिवंत माणसं, जनावरं पात्यासारखी वाहून गेली. जे जिवंत आहेत त्यांना पुन्हा उभा करण्यासाठी यंत्रणा झटत आहेत. पोलिसांचं श्वान असलेला रॉकीही या मदतकार्यात आपली भूमिका चोख बजावत आहे.

Rocky Dog | पूरग्रस्तांना 'रॉकी'ची मदत, बचावकार्यात बदमाशी करणाऱ्यांवर वचक
| Updated on: Aug 14, 2019 | 3:50 PM
Share

Rocky Dog कोल्हापूर : पूरग्रस्त सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. सरकारी यंत्रणा असो किंवा विविध संस्था-संघटना, जो तो आपआपल्या परीने शक्य ती सर्व मदत जोमाने करत आहे. हे मदतकार्य सुरु असताना, रॉकीही (Rocky Dog ) सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

पुराने जिवंत माणसं, जनावरं पात्यासारखी वाहून गेली. जे जिवंत आहेत त्यांना पुन्हा उभा करण्यासाठी यंत्रणा झटत आहेत. पोलिसांचं श्वान असलेला रॉकीही या मदतकार्यात आपली भूमिका चोख बजावत आहे.

रॉकी हा श्वान बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात काम करतो. पूरग्रस्त भागात रॉकीला पाचारण करण्यात आलं आहे. रॉकी विमानतळावर सेवा बजावत आहे.  शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना वायूदलाच्या एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टरद्वारे मदतसाहित्य पाठवण्यात आलं. हेलिकॉप्टरमध्ये कोणतेही साहित्य पोहोचविण्यापूर्वी तसेच ठेवल्यानंतर त्याची तपासणी रॉकी करतो. कालही त्याने एमआय 17 मध्ये आपली सेवा बजावली. गेल्या 3 दिवसांपासून तो विमानतळावर सेवा देत आहे.

शहरातील महालक्ष्मी मंदिर,विमानतळ ही ठिकाणे रॉकीकडून दररोज तपासली जातात. तसेच रेल्वे स्टेशन, मॉल अशा  गर्दीच्या ठिकाणीही तो आपली सेवा बजावत असतो. गेल्या 7 वर्षापासून रॉकी या पथकात असून त्यासाठी सहाय्यक उपनिरीक्षक राजन कांबळे हे हँडलर म्हणून काम पाहतात.

हेलिकॉप्टरने मदत

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना वायूदलाच्या एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने कालपर्यंत 24 टन अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. काल  दुपारी 4 पर्यंत सुमारे 6 टन अन्न,पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कुरूंदवाड, कवठेगुलंद आणि कनवाड येथे करण्यात आला. मंगळवारपर्यंत सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी 40 टन मदत साहित्य या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पाठविण्यात आले.

उजळाईवाडी येथील विमानतळावरुन पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोहचवत आहेत.

काल सकाळी 11 वाजता  वायुदलाचे एमआय 17 व्ही 5 हे हेलिकॉप्टर शिरोळकडे जाण्यासाठी हवेत झेपावले. हेलिकॉप्टरमध्ये दूध, बिस्किटे आणि इतर जीवनावश्यक साहित्य उजळाईवाडी येथील विमानतळावर भरण्यात आले. वायुदलाच्या ज्या हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्तांना सध्या मदत पोहोचवण्यात येत आहे, त्यासाठी ग्रुप कॅप्टन श्रीधर, पायलट कृष्णन, सहपायलट नवाज, स्कॉड्रन लिडर संदिप पोवार,फ्लाईट गनर जे.डब्ल्यू गुप्ता, फ्लाईट इंजिनियर साजन गोगोई हे वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 हेलिकॉप्टरसाठी कार्यरत आहेत.

अवघ्या 15 मिनीटात कुरूंदवाड येथील सैनिकी पॅटर्न निवासी शाळेच्या प्रांगणात हे हेलिकॉप्टर उतरले. या ठिकाणी हेलिकॉप्टरमधील साहित्य उतरून शाळेमध्ये ठेवण्यात आले. या ठिकाणावरून कुरूंदवाड आणि तेरवाड येथील पूरग्रस्तांसाठी बोटीतून, वाहनातून तर काही ठिकाणी चालत जाऊन ही मदत पूरग्रस्तांपर्यत पोहचवण्यात येत आहे. यानंतर एमआय 17 ने पुन्हा एकदा शिरोळकडे उड्डाण केले.

शिरोळ येथील दत्त नगर येथे उतरल्यानंतर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स, बिस्किटे तसेच अन्य साहित्य हेलिकॉप्टरमध्ये भरण्यात आले. हे साहित्य कुरूंदवाड येथे पोहचवण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा या हेलिकॉप्टरमध्ये अन्न,पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तू भरून हे हेलिकॉप्टर हवेत झेपावले.

कनवाड येथे आल्यानंतर हेलिकॉप्टर एका विशिष्ट उंचीवर खाली आणण्यात आले. परिसरातील पूरग्रस्तांसाठी आतमधील वस्तू खाली सोडण्यात आल्या. पुन्हा हेलिकॉप्टर कवठेगुलंदकडे झेपावले. या ठिकाणी बास्केटमध्ये सर्व वस्तू घालून हे बास्केट खाली सोडण्यात आली. खाली असणाऱ्या पूरग्रस्तांनी बास्केटमधील वस्तू उतरवून घेतल्या. त्यानंतर एमआय 17 पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीसाठी कोल्हापूर येथील विमानतळाकडे रवाना झाले.

40 टन मदत साहित्याचे वाटप- स्कॉड्रन लिडर संदिप पोवार

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भाग आणि शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर,राजापूर,कुरूंदवाड व अन्य गावांमध्ये गेल्या 7 दिवसांत 40 टन अन्न-धान्य,वैद्यकीय सुविधा आणि इतर साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. काही गावांमध्ये एअर ड्रॉपिंगने तर काही ठिकाणी बास्केटच्या माध्यमातून मदत साहित्य दिले आहे. नौदल, एनडीआरएफ, लष्कर यांची वैद्यकीय पथके तसेच रेस्क्यू टिम यांनाही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोहचवले आहे, अशी माहिती वायुदलाचे स्कॉड्रन लिडर संदिप पवार यांनी दिली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.