लॉकडाऊदरम्यान अनाथ महिलेवर पोलिसांकडून अंत्यसंस्कार, फोटो पाहून अनेकजण भावूक

देशाता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला (Police funeral to Orphans women death) आहे.

लॉकडाऊदरम्यान अनाथ महिलेवर पोलिसांकडून अंत्यसंस्कार, फोटो पाहून अनेकजण भावूक
Follow us
| Updated on: Apr 16, 2020 | 1:30 PM

लखनऊ : देशाता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला (Police funeral to Orphans women death) आहे. हा लॉकडाऊन यशस्वी करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. देशावर आलेल्या या संकटात डॉक्टर आणि पोलीस महत्त्वाची भूमीका बजावत आहेत. याच दरम्यान पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील एका अनाथ महिलेचा मृत्यू झाल्याने तिच्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून सध्या अनेकजण भावनिक (Police funeral to Orphans women death) होत आहेत.

उत्तर प्रदेशच्या मेरठमधील जनपद सहारनपूर येथील किशनपूर गावात मिना नावाच्या एक महिलेची तब्येत ठिक नव्हती. ती अनाथ असल्यामुळे पोलिसांनी तिला गाडीतून रुग्णालयात नेऊन दाखल केले. दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी या महिलेवर अंत्यसंस्कार केले.

देशात लॉकडाऊन असल्यामुळे सर्वत्र बंद आहे. या दरम्यान गरिब कुटुंबाचेही हाल होत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून या गरिब कुटुंबांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. लॉकडाऊन दरम्यान पोलीस आपल्या ड्युटी व्यतिरिक्त अनेक सामाजिक कामं करतानाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोमधून माणुसकीचे दर्शन घडत आहेत.

नुकतेच एक तरुण सुरतवरुन भोपाळ येथे शेकडो किमी चालत आला होता. चालत आल्यामुळे त्याच्या पायाला जखमा झाल्या होत्या. अशावेळी भोपाळ पोलिसांनी स्वत: त्या तरुणांच्या पायाच्या जखमेला औषध लावून ते साफ केले होते. याचाही फोटो सर्वत्र व्हायरल झाला होता.

दरम्यान, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. आतापर्यंत देशात दहा हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 414 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.