AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तान्ह्या बाळाला घेऊन ती पोलीस भरतीला पोहचली, अन् मग जे घडलं ते हृदय हेलावणारं…

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस कॉन्स्टेबल भरती सुरु आहे. आता मैदानी चाचण्या सुरु आहेत. महिला उमेदवारांची फील्ड टेस्ट आजपासून सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी पिंपरी-चिंचवड भरती केंद्रात नाव नोंदविलेल्या 1 हजार 200 महिला उमेदवारातील 864 महिला भरतीसाठी पोहचल्या. त्यातील 729 महिलांनी मैदानी चाचण्या पूर्ण केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

तान्ह्या बाळाला घेऊन ती पोलीस भरतीला पोहचली, अन् मग जे घडलं ते हृदय हेलावणारं...
Police Constable Recruitment 2024Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 07, 2024 | 6:37 PM
Share

राज्यात 19 जून पासून पोलिस भरती सुरु आहे. कारागृहातील पोलीस शिपायाच्या एका पदासाठी सातशेहून अधिक तरुणांनी अर्ज केले आहेत. राज्यात सर्वत्र उमेदवारांना मैदानी परीक्षांना सामोरे जावे लागत आहे. 17 हजार पदांसाठी तब्बल 17 लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या पोलीस भरतीत कुठे पावसाचे तर कुठे उन्हाचे चटके बसत आहेत. अशा विचित्र वातावरणात उमेदवारांना मैदानी चाचण्यांना सामोरे जावे लागत आहे. या पोलीस भरतीत महिलांचा संख्या देखील मोठी आहे. पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरातील भरती केंद्रात अजब प्रकार घडला आहे, तेथे पोलिस शिपायाच्या भरती प्रक्रियेचा एक अनोखा फोटो व्हायरल झाला आहे. या भरती केंद्रावर एक महिला उमेदवार  तान्ह्या मुलाला आपल्या कडेवर घेऊन दाखल झाल्याने पोलीस अधिकारी अवाक् झाले आहेत. आधुनिक युगातील या ‘हिरकणी’ला सर्व सलाम करीत आहेत.

पुण्याला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवड़मध्ये ( Pimpri Chinchwad ) पोलीस कॉन्स्टेबल भरती सुरु आहे.या भरती प्रक्रियेत ( Police Constable Recruitment ) एक अनोखा फोटो व्हायरल झाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल बनण्याचे स्वप्न पाहणारी एक महिला तिच्या चार महिन्यांच्या बाळालाच घेऊन भरतीसाठी दाखल झाल्याचे पाहून अधिकारी अवाक् झाले आहेत. ज्यावेळी तिच्या मैदानी चाचणीची वेळ आली आहे. तेव्हा भरती प्रक्रियासाठी फील्डवर टेस्ट देताना तिच्या जवळच्या अवघ्या चार महीन्यांच्या तान्ह्या बाळाला कुठे ठेवायचे याचा प्रश्न तिच्या मनात उत्पन्न झाला. कारण तिच्या सोबत कोणीही नव्हते. तेव्हा ड्यूटीवर तैनात महिला पोलिसाला अखेर तिची अडचण समजली आणि त्या महिला पोलिसांनी त्या बाळाला स्वत:कडे घेत त्याला जोजावले आणि बाळ देखील लगेत शांत झालं..हा फोटो हृदय पिळवटणारा आहे. एका मातेचं मन दुसरी माताच जाणू शकते अशा भावना दर्शविणारं हे छायाचित्र बोलकं आहे.

सरकारी नोकरी

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी तरुणांची गर्दी होत आहे. साध्या ‘बॅण्ड्स मन’ पदासाठी देखील शेकडो  उमेदवार अर्ज करीत आहेत. सर्वाधिक पदे पोलीस कॉन्स्टेबलसाठी आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक तरुण आणि तरुणी पोलिस कॉन्स्टेबल भरतीसाठी दाखल झाले आहेत. पिंपरी- चिंचवड संत ज्ञानेश्वर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पोलिस भरती चालू आहे. पोलिस महिलांची मैदानी चाचणी झाली आहे.ज्यात पहिल्या दिवशी 864 महिलांनी सहभाग घेतला. यातील 729 महिलांच्या मैदानी चाचणी झाल्या आहेत.

कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.