नवी मुंबईत राजकीय वातावरण तापलं, आरोग्य सेवेच्या उद्घाटनासाठी गणेश नाईकांना एनवेळी आमंत्रण

स्थानिक आमदारांना दूर ठेवण्याचा कुटील डाव सुरू असल्याचं जयवंत सुतार यांनी म्हटलं आहे.

  • हर्षल पाटील, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई
  • Published On - 14:52 PM, 19 Jan 2021
नवी मुंबईत राजकीय वातावरण तापलं, आरोग्य सेवेच्या उद्घाटनासाठी गणेश नाईकांना एनवेळी आमंत्रण
गणेश नाईक यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांची अवस्था ही बुडत्या जहाजाप्रमाणे झाली आहे.

नवी मुंबई : आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशात आता नवी मुंबईतही राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई मनपाच्या आरोग्य सेवेच्या उदघाटनसाठी गणेश नाईकांना एनवेळी आमंत्रण देण्यात आलं. यामुळे स्थानिक आमदारांना डावललं जात असल्याची आक्रमक टीका माजी महापौर जयवंत सुतार यांनी केली आहे. (Political news Navi Mumbai Ganesh Naik invited late for inauguration of health service )

पालकमंत्री यांच्या हस्ते 2 रुग्णालयातील आरोग्य सेवेचे 18 जानेवारी सायं 4.30 वाजता उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आले होते. त्याच दिवशी गणेश नाईक यांना कार्यक्रमाच्या काही तास आधी दूरध्वनीवरून आमंत्रण देण्यात आलं. म्हणजेच स्थानिक आमदारांना दूर ठेवण्याचा कुटील डाव सुरू असल्याचं जयवंत सुतार यांनी म्हटलं आहे.

इतकंच नाहीतर राज्यातील सत्ताधाऱ्यांचा हा माज असल्याची टीकाही नाईक समर्थकांकडून करण्यात आली आहे. पालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर असल्याचाही आरोप यावेळी जयवंत सुतार यांनी केला. अधिक माहितीनुसार, ऐरोलीतीलल राजमाता जिजाऊ रुग्णालय आणि नेरुळ येथील मॉसाहेब मिनाताई ठाकरे या दोन रुग्णालयातील आरोग्य सेवांच्या लोकार्पण कार्यक्रमाला भाजप नेत्यांना डावलण्यात आलं असून या दुष्कृत्याचा आम्ही निषेध करत असल्याचंही जयवंत सुतार म्हटलं आहे.

नवी मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली असून विरोधकांना आतापासून पराभव नजरेस पडू लागला आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेचा दुरुपयोग करून रडीचा डाव सुरू आहे. नवी मुंबईतील विकास कामांचं श्रेय लाटण्याचं काम सत्ताधारी करत आहेत. नवी मुंबईत सत्ताधारी अजूनही काहीच करू शकले नाहीत. त्यामुळे श्रेय लाटण्याचा हा केविलवाना प्रयत्न सुरू आहे का ? असा सवालही जयवंत सुतार यांनी विचारला आहे. (Political news Navi Mumbai Ganesh Naik invited late for inauguration of health service )

संबंधित बातम्या –

‘तांडव’ विरोधातील ठिय्या आंदोलन पोलिसांनी उधळलं, आमदार राम कदम ताब्यात

गावगाड्याचा निकाल काय सांगतो?, महाआघाडी, भाजपचं आगामी राजकारण कसं असेल?; वाचा स्पेशल रिपोर्ट

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसेंचं पहिलं ट्विट, म्हणाले…

 

(Political news Navi Mumbai Ganesh Naik invited late for inauguration of health service )